दुर्मिळ वनाैषधांच्या पेशींचे संवर्धन

अवधूत कुलकर्णी
शनिवार, 19 मे 2018

पिंपरी - ‘‘वावडिंगसारख्या काही औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांच्या पेशींचे संवर्धन करण्याचा अभिनव उपक्रम निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीतील शास्त्रज्ञ संगीता कुलकर्णी यांनी हाती घेतला आहे. 

अलीकडच्या काळात आयुर्वेदिक औषधे घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यातील गरज ओळखून कुलकर्णी यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. याबाबत भोरमधील संशोधन आणि विकास प्रकल्प सुरू केला. 
‘‘वनस्पतींच्या संवर्धनासाठी त्यांच्या पेशींचे संवर्धन करण्यात येते. एका पेशीपासून एकाच प्रकारच्या अनेक वनस्पती तयार करण्यात येतात.

मधुपर्णी वनस्पतीचा वापर प्रामुख्याने चहा आणि सरबताच्या अर्कामध्ये होतो. त्याचा अधिकाधिक क्षेत्रांत कसा वापर करता येईल, यावर संशोधन सुरू आहे. सध्या ‘तंत्रज्ञानात महिलांचा सहभाग’ विषयावर पीएच.डी. सुरू आहे. त्याचप्रमाणे शाश्‍वत विकासासाठी बांबूचा वापर करणे गरजेचे आहे. त्याच्या उत्पादनासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बांबूची रोपे सहज उपलब्ध होत नाहीत. ती रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे. 

महिलांपर्यंत जैवतंत्रज्ञान पोचविण्यासाठी महिलांच्या बचत गटांचा वापर सुरू केला आहे. जैवतंत्रज्ञान हे अनेक तंत्रज्ञानांचा समुच्चय आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने त्याचा वापर शेतीसह जीवनाच्या सर्व क्षेत्रांत केला जाऊ शकतो. 
शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी नवीन संधींची उपलब्धता करून देणे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये जैव तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार करणे, दुर्गम भागातील महिलांच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणे, नैसर्गिक गोडवा असणारी मधुपर्णी वनस्पतीच्या अर्कावरील संशोधन आणि शाश्‍वत विकासासाठी बांबूच्या वापरावर भर देणे याबाबतीतील योगदानासाठी त्यांना नुकताच केंद्र सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्या सध्या निगडीतील ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या रतिलाल भगवानदास जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख आहेत.

केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या आर्थिक मदतीतून रब्बी पिकांचे संरक्षण, गांडूळखत निर्मिती व वापर, पशुआहार व्यवस्थापन, खरिपातील पिकांचे संरक्षण या विषयांवर शेतकऱ्यांसाठी माहितीपर पुस्तिका केल्या. आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांत औषधी वनस्पतींच्या संवर्धनाबाबत जागृती करणे, शालेय विद्यार्थ्यांना पेशीसंवर्धन आणि शेतकी जैवतंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण देणार आहे.
- संगीता कुलकर्णी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Promotion of rare virulent cells