मिळकतींची नोंदणी करून कर भरा

Shravan-Hardikar
Shravan-Hardikar

पिंपरी - ‘शहरातील मिळकतींची नोंद मिळकतकर विभागाकडे न केलेल्या मिळकतधारकांनी १५ दिवसांत नोंदणी करून मिळकतकर भरावा. तसेच अधिकृत व अनधिकृत मिळकतींचा वार्षिक कर भरावा,’’ असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक आहेत. तरीही अद्याप बहुतांश नागरिकांनी मिळकतकर भरलेला नाही. यामध्ये शहरातील अधिकृत व अनधिकृत बांधकामे केलेल्यांचाही समावेश आहे. तसेच काही नागरिकांनी मिळकतींची नोंदणीच केली नसल्याचे आढळले आहे. अशा नागरिकांनी १५ दिवसांत मिळकतींची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करून हर्डीकर म्हणाले, ‘‘शहरातील सर्व मिळकतींचे शंभर टक्के सर्वेक्षण केले जात आहे. त्यात तीन प्रकारची करबुडवेगिरी आढळली आहे. यात मिळकतकर विभागाकडे मिळकतींची नोंदणी न केलेले, दोन खोल्या असताना एकाच खोली नोंद करणे, अशा प्रकारे मिळकतींची अर्धवट नोंदणी केलेले. मिळकतीची नोंद निवासी असताना व्यापारी किंवा व्यावसायिक कारणासाठी वापर करणे, अशा पद्धतीने मिळकतींच्या वापरामध्ये बदल केलेल्या मिळकतधारकांचा समावेश आहे. अशा स्वरूपाच्या तक्रारी काही सुज्ञ नागरिकांनीही केलेल्या आहेत. त्यानुसार पडताळणी करून कारवाई केली जाईल. तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या काळात २०१२ मध्ये अशा मिळकतींचा शोध घेतला होता. सुमारे ६६ हजार मिळकती आढळल्या होत्या. आम्ही गेल्या वर्षापासून मिळकतींचे सर्वेक्षण सुरू केले आहे.’’ 

मिळकतकराची वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न केलेल्या १२७ कर्मचाऱ्यांवर कारवाई केलेली आहे. काही कर्मचाऱ्यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. तसेच, थकबाकीदार मिळकतधारकांना वकिलांमार्फत 
नोटीस पाठविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे अनेक जण थकबाकी भरत आहेत.

शिक्षकांबाबत सरकारच निर्णय घेईल
पती-पत्नी एकत्रीकरणाबाबत महापालिकेकडे शिक्षकांचे अर्ज आलेले आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने तसा ठराव केलेला आहे. त्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘शिक्षकांबाबतच्या ठरावाची तपासणी सुरू आहे. आंतर जिल्हा बदलीबाबत राज्य सरकारच निर्णय घेईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com