मिळकत कर सवलतीचे प्रकल्प सुरू आहेत का?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुणे - मिळकत करातील सवलत घेण्यासाठी मिळकतधारकांनी सुरू केलेले गांडूळ खत प्रकल्प, सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग हे प्रकल्प सुरू आहेत की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश कर आकारणी आणि संकलन विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. चालू आर्थिक वर्षात सुमारे ७४ हजार ३६० मिळकतींनी या सवलतीचा फायदा घेतला आहे. 

निवासी इमारतींमध्ये अपारंपरिक ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महपालिकेने करात सवलत देण्याचे धोरण राबविले आहे. गांडूळ खत प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग यापैकी एक उपक्रम राबविणाऱ्या मिळकतींना करात पाच टक्के आणि दोन किंवा त्यापेक्षा अधिक उपक्रम राबविणाऱ्या मिळकतींना करात दहा टक्के सवलत देण्यात येते. केवळ सवलत मिळविण्यासाठी अशाप्रकारचे प्रकल्प राबविले आणि नंतर ते बंद पडले तर सवलत कायम राहू शकते. या सवलतीचा गैरफायदाही काही मिळकतदार घेऊ शकतात. यापार्श्‍वभूमीवर संबंधित प्रकल्प सुरू आहेत की नाही, हे तपासण्याकरिता महापालिकेच्या मिळकत कर विभागाची स्वतंत्र यंत्रणा नाही. सवलत देण्याचा मूळ उद्देश साध्य होऊ शकत नाही, महापालिकेचे मिळकत कराचे नुकसान होऊ शकते.

या प्रकल्पांच्या आधारे मिळकत करात सवलत घेणाऱ्या मिळकतींची संख्या दरवर्षी वाढत आहे. यापार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या कर संकलन विभागाने सवलत रद्द केल्याचे प्रमाणही नगण्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Property Tax and Concession Project Municipal