Property Tax : पुरावा न दिल्यास मिळकतकराची सवलत जाणार

शहरातील निवासी मिळकतींना करात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे.
property tax Municipal administration collected  fill Property Tax Form No. 3  before 15th November 2023 to get back 40 persent amount
property tax Municipal administration collected fill Property Tax Form No. 3 before 15th November 2023 to get back 40 persent amount sakal

पुणे : महापालिका प्रशासनाने ज्या नागरिकांकडून मिळकतकराची ४० टक्क्यांची वसुली केलेली आहे किंवा ज्यांना १०० टक्के कर लावला आहे. त्यांना ही ४० टक्क्याची रक्कम परत मिळविण्यासाठी व सवलत कायम स्वरुपी लागू करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी प्रॉपर्टी टॅक्स फॉर्म नंबर ३ (पीटी ३) हा अर्ज भरून द्यावा लागणार आहे. आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे. पहिल्या दोन महिन्यात जास्तीत जास्त कर नागरिकांनी भरावा व त्यासाठी प्रोत्साहन द्यावे यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे आयुक्त कुमार यांनी सांगितले.

त्या सोबत संबंधित मिळकतीमध्ये ते स्वतः राहत असून, भाडेकरू राहात नसल्याचा पुरावाही द्यावा लागणार आहे. त्यामुळे जे नागरिक पुरावा देऊ शकणार नाहीत, त्यांची ४० टक्क्यांची सवलत काढून घेतली जाणार आहे. तर जे पुरावा देणाऱ्यांना सवलत मिळेल व भरलेली ४० टक्क्यांची रक्कम पुढील चार वर्षात वळती केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहरातील निवासी मिळकतींना करात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे. त्यानंतर आता मिळकतकर वसुलीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत निवासी मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना ५ टक्के ते १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या निवासी व बिगर निवासी मिळकतींना देखभाल दुरुस्तीकरिता देण्यात येणारी १५ टक्के वजावट रद्द करून शासन निर्णयानुसार ती १० टक्के करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२३ पासून करण्यात येणार आहे. या सर्व मिळकतींना १५ मे पासून बिलांचे वाटप केले जाईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

नव्या मिळकतीचे बिल वाटप जून मध्ये

शहरात एप्रिल २०१९ नंतर नवीन बांधकामे झाली आहेत, अशा सुमारे १ लाख ६७ हजार मिळतींना १०० टक्के कर लावण्यात आला आहे. तर एप्रिल २०१८ मध्ये जीआयएस सर्वेक्षण करून ज्या मिळकतीमध्ये भाडेकरू राहत आहेत किंवा ज्यांचे एक पेक्षा दोन मिळकती आहेत अशांची ४० टक्के सवलत काढून टाकण्यात आली.

या सर्व मिळकतींनाही ४० टक्के सवलतीचा लाभ देण्यात येणार असून, त्यांना ३१ मे नंतर मिळकतकराची बिले वाटप केली जाणार आहेत. तसेच ज्या नागरिकांनी निवासी मिळकतींची १ एप्रिल २०१८ पासून ३१ मार्च २०२३ पर्यंत ४० टक्के सवलतीची रक्कमही भरलेली आहे. ही रक्कम परत मिळविण्यासाठी व सवलत कायम ठेवण्यासाठी ‘पीटी ३’ अर्ज भरून पुराव्यांसह सादर करावा लागणार आहे. यासाठी १५ नोव्हेंबर२०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. हे अर्ज संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे सादर करावेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

जुलैनंतर काढणार लकी ड्रॉ

पुणे महापालिकेतर्फे निवासी मिळकतकर भरणाऱ्यांना १ जून ते ३१ जुलै या कालावधीत ५ ते १० टक्के सवलत दिली जाणार आहे. ही मुदत संपल्यानंतर महापालिकेच्या अर्थसंकल्पात नियमीत कर भरणाऱ्या नागरिकांसाठी लकी ड्रॉ योजनेची घोषणा केली आहे. त्याची प्रक्रिया सुरू करून नशीबवान मिळकतधारकास टू बीएचके घर, चारचाकी, दुचाकी, स्मार्ट फोन यासह इतर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com