पुणे शहरातील मिळकतींच्या व्यवहाराची होणार ऑनलाइन नोंद

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे  - शहराच्या हद्दीत मिळकतीची खरेदी-विक्रीनंतर त्याची नोंद महापालिकेच्या दफ्तरी करून मिळकत कराची आकारणी अथवा नावात बदल करण्यासाठी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. दस्तनोंदणीनंतर खरेदीदाराची ऑनलाइन नोंद महापालिकेला प्राप्त होणार आहे.

भूमी अभिलेख विभागाने ‘ई-म्युटेशन’ योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत जमिनीची अथवा सदनिकेची खरेदी-विक्री झाल्यानंतर त्याची सातबारा आणि फेरफार उताऱ्यावर नोंद घालण्यासाठी तलाठ्याकडे रजिस्टर दस्त ऑनलाइन पाठविला जातो. त्यामुळे आता नागरिकांना तलाठ्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत. पुढील टप्प्यात महापालिका आणि नगरपालिका यांनादेखील सामावून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महापालिका आणि नोंदणी महानिरीक्षक यांच्या बैठका झाल्या. त्यात महापालिकेनेदेखील या प्रस्तावाला मान्यता दिली. शहराच्या हद्दीत जुन्या मिळकतीची खरेदी-विक्रीनंतर कराच्या नोंदणीसाठी स्वतंत्रपणे रजिस्टर दस्त, इंडेक्‍स टू आणि कागदपत्रे सादर करावी लागत होती. त्यानंतर नावामध्ये बदल करून कर आकारणी केली जात होती. परंतु, आता रजिस्टर दस्त आणि इंडेक्‍स ऑनलाइन पद्धतीने तलाठ्याबरोबरच पालिकेलाही दिला जाईल.  

पालिका प्रकल्प राबविण्यास तयार आहे. दस्तनोंदणीची कागदपत्रे पालिकेकडे ऑनलाइन पाठविण्यापेक्षा आवश्‍यक कागदपत्रे पाठविण्याबाबत चर्चा झाली आहे, असे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com