कवठे येमाईत जुलूस-ए-मोहम्मदीचे आयोजन

कवठे येमाईत जुलूस-ए-मोहम्मदीचे आयोजन
कवठे येमाईत जुलूस-ए-मोहम्मदीचे आयोजन

टाकळी हाजी (पुणे): प्रेषीत महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनी ईद-ए-मिलादुन्नबी इंतेजामीया कमेटी तर्फे कवठे येमाई (ता. शिरूर) येथील जुलूस-ए-मोहम्मदीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू बांधवांचा या जुलूस मध्ये सहभाग व मक्का मदिनाची प्रतिकृती आकर्षक ठरली.
 
कवठे येमाई (ता. शिरूर) येथील जामा मसजीद मधून हा जुलूस निघाला होता. जूलूस निघण्याच्या अगोधर रिमझीम पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बदल झाला होता. जूलूस-ए-मोहंमदी जिंदाबाद, नारे तकबीर अल्ला हो अकबर... अशा विविध घोषणांनी परीसर दुमदुमून गेला होता.

आजचा दिवस पवीत्र असून, आपण सर्वांनी प्रेषीत महंमद पैंगबर यांनी दाखविलेल्या शांतीच्या मार्गाने चालले पाहिजे. आपण सर्वांनी प्रेम, सदभावनेचे प्रतीक व्हायला पाहिजे, असे मौलाना अब्दुल रज्जाक यांनी सांगितले. या वर्षी पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ईश्वराने कृपा करावी आणी पाऊस व्हावा, अशी प्रार्थना यावेळी सर्व मुस्लीम बांधवांनी केली. जुलूस मध्ये मक्का मदिनाचा देखावा तयार करण्यात आला होता. मका मदीना देखाव्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ध्वज व मुलांचा सहभाग वाढला होता. संपूर्ण गावातून हा जुलूसची मिरवणूक झाल्यावर नात ए रसूल सादर करत जुलूस चा समारोप जामा मसजीद जवळ करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com