1Girish_Bapat_36.jpg
1Girish_Bapat_36.jpg

पालखी मार्गातील दारू आणि मांस विक्री बंद करण्याबाबत प्रस्ताव मांडू : गिरीश बापट

पुणे : ''वारकरी हा समाजाचा केंद्रबिंदू आहे. प्रशासनाने पालखी सोहळ्यातील सर्वच पालख्यांची समान काळजी घ्यावी. पालखी मार्गावरील दारू आणि मांस विक्री बंद करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मांडू'', असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.

आळंदी येथील वारकऱ्यांना दर्शनाची सुविधा व्हावी यासाठी दर्शन बारी उभारण्याबाबत पाच पुणे जिल्हा प्रशासनाने पाच दिक्सात अहवाल द्यावा. जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून निर्णय घेऊ असे बापट यांनी सांगितले.

देहू देवस्थान पालखी सोहळ्यात पालखी प्रस्थानावेळी वारकऱ्यांना पिण्याचे पाण्याची सुविधा, आकुर्डी पालखी तळासोबतच आणखी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना देऊ देवस्थानच्या वतीने करण्यात आली. तसेच सोपानदादा पालखी मार्गावर फिरते स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळावा, तसेच परती मार्गावर पोलिस बंदोबस्त द्यावा अशी मागणी करण्यात आली. त्यावर पालकमंत्री बापट यांनी वारकरी व्यवस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या सूचनांची प्रशासनाने अंमलबजावणी करावी असे निर्देश प्रशासनाला दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com