स्वारगेट-कात्रज मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी प्रस्ताव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

पुणे - मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज या वाढीव मार्गाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी 73 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. 

शहरातील बहुचर्चित मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचा कात्रजपर्यंत विस्तार करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन या कंपनीला या वाढीव मार्गाचा डीपीआर तयार करण्याची विनंती केली आहे. यासाठी लागणार खर्च महापालिका देईल, असे कळविण्यात आले होते. त्यानुसार या कंपनीने हे काम सुरू केले असून, त्यासाठी आठ महिन्यांची मदत देण्यात आली आहे. 

राज्य सरकारने स्वारगेट ते कात्रज या वाढीव मेट्रोच्या मार्गाला यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली आहे. या वाढीव मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यासाठी त्याचा डीपीआर तयार करून घेणे आवश्‍यक आहे. त्यानुसार डीपीआर करण्याचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनीला देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला आहे. 

Web Title: Proposal for creating a DPR of the Swargate-Katraj Metro project