खेड तालुका लॉकडाउन करण्यासाठी उचलेले हे महत्त्वाचे पाऊल...

lockdown
lockdown

राजगुरूनगर (पुणे) : कोरोनाबधितांच्या वाढत्या संख्येमुळे खेड तालुका १०  दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउन करण्याचा प्रस्ताव, खेडचे उपविभागीय अधिकारी तथा सनियंत्रण अधिकारी संजय तेली यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. 

खेड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १५० वर गेली आहे. तालुक्यात सध्या ५८ कंटेंन्मेंट झोन करण्यात आले आहेत. कोरोनाबधित वेगाने वाढत चालल्याने तेली यांनी तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर तालुका लॉकडाउन करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

खेड  तालुक्यात ८ ते ९ लाख लोक राहत आहेत. महाराष्ट्रातील सुमारे १५ जिल्ह्यातील लोक खेड तालुक्यात कामासाठी राहत आहेत. तसेच, अजूनही परप्रांतातील अनेक लोक आहेत. लॉकडाउन शिथिल झाल्यावर संसर्ग वाढू लागला असला, तरी लोकसंख्येच्या तुलनेने प्रमाण कमी आहे. सध्या कोरोनाबधित व्यक्तींकडून त्यांच्या जवळच्या व्यक्तींना संसर्ग झाल्याच्या घटना असून, समूह संसर्गाचे प्रकरण नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. तरी संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तालुका लॉकडाउन करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे तेली यांनी सांगितले. 

कोरोनाबधित रुग्णांसाठी महाळुंगे येथील कोविड केअर सेंटरमध्ये अजून २०० रुग्ण ठेवता यावेत, असे प्रयत्न सुरु आहेत. त्या ठिकाणी अधिक १५ डॉक्टर देण्यात येणार आहेत. भूमीलेख उपअधीक्षक उमेश झेंडे यांची तेथे प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजगुरूनगर, चाकण, आळंदी या नगरपरिषदांना अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com