टँकरने पाणी पुरवण्याचा प्रस्ताव मंजूर होऊनही गावे तहानलेली

दत्ता म्हसकर
रविवार, 20 मे 2018

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील 7 गावे व 77 वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सहा टँकर (ता. 17) मंजूर केले मात्र प्रत्त्यक्ष टॅंकर उपलब्ध झाले नसल्याने तहानलेल्या गावांना पाणी मिळू शकले नाही. 

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील 7 गावे व 77 वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सहा टँकर (ता. 17) मंजूर केले मात्र प्रत्त्यक्ष टॅंकर उपलब्ध झाले नसल्याने तहानलेल्या गावांना पाणी मिळू शकले नाही. 
उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली असताना तहानलेली गावे व वाड्यातील सुमारे 16 हजार 754 लोकवस्ती टँकरच्या प्रतीक्षेत आहे. यात हिवरे पठारावरील सुकाळवेढे, हिवरे तर्फे मिण्हेर ही गावे त्यांच्या प्रत्येकी तीन वाड्या तसेच हातविज व गुंळूचवाडीच्या तीन वाड्यांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. दुर्गम आदिवासी भागातील कोपरे, मांडवे, मुथाळणे येथे खासगी टॅंकर जात नसल्याने पाणी पुरवठा करण्यासाठी शासकीय टँकरची मागणी करण्यात आली. परंतु शासकीय टॅंकर मंजूर झाला नाही त्याऐवजी खासगी संस्थेस टॅंकर पुरविण्याबाबत आदेश देण्यात आल्याने या गावाचा पाणीप्रश्न सुटणार नसल्याचे दिसत आहे. 

आदिवासी भागातील कोपरे, मुथाळणे, जळवंडी, अंजनावळे, आलमे तर पूर्व भागातील नळवणे व शिंदेवाडी अणे गावच्या वाड्यासह 77 वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. येथे पाणी पुरवठा करण्यासाठी बारामतीच्या अजितदादा वाहतूक संस्थेकडून टँकर देण्यात येणार आहेत. टँकर मंजूरी मिळाली मात्र टँकर मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: proposal of supply water tanker has been accepted but still villages were thirsty