Crime News : आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा;  २ पिडीत महिलांची सुटका
Prostitution business under Ayurvedic treatment center 2 Rescue victim women
Prostitution business under Ayurvedic treatment center 2 Rescue victim womenesakal

धायरी : सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेने सिंहगड रोड परिसरात आयुर्वेदिक उपचार केंद्रावर छापा टाकून २ पिडीत महिलांची सुटका केली. ऑफिस नं.९. तिसरा मजला, अभिमन्यु पूरम, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे येथे आयुर्वेदिक उपचार सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत होता. ३ मे रोजी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली.

अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. आयुर्वेदिक उपचार केंद्रामध्ये आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. तात्काळ छापा कारवाई करून २ महिलांची सुटका करण्यात आली. मोबाईल व रोख रक्कमेसह एकुण १,५२,००० रुपयांचा मद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यावेळी मालक व चालक यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरूध्द सिंहगड पोलीस स्टेशन येथे गुरनं १९२ / २०२३ भादंवि ३७०, ३४ सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.  आरोपी व पिडीत महिलांना पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त, रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार अजय राणे, तुषार भिवरकर, रेश्मा कंक, अमित जमदाडे, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com