Sun, May 28, 2023

Crime News : मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय, व्यवस्थापकासह सात तरुणी ताब्यात
Published on : 19 March 2023, 1:44 pm
पुणे : कोरेगाव पार्कमधील एका स्पामध्ये तरुणींकडून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या मसाज सेंटरच्या चालकाला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी मसाज सेंटरमधून चार परदेशी महिलांसह सात तरुणींना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी मसाज सेंटरच्या दोन चालकांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मसाज सेंटरचा व्यवस्थापक उत्तम शेषराव सोनकांबळे (वय ३८, रा. खराडी) आणि स्पा चालक गजानन दत्तात्रेय आडे अशी आरोपींची नावे आहेत.
त्यापैकी आरोपी उत्तम सोनकांबळे याला अटक केली आहे. कोरेगाव पार्क भागातील साऊथ मेन रस्त्यावरील एका स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. या मसाज सेंटरमध्ये परदेशी महिला असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सेंटरवर छापा टाकून चार परदेशी महिलांसह सात जणींना ताब्यात घेतले.