Crime News : कोरेगाव पार्कमधील स्पा सेंटर, मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय

सात परदेशी तरुणींसह १२ पीडित तरुणींची सुटका, रेस्क्यू फाऊंडेशनमध्ये रवानगी
Prostitution in spa center massage parlor in Koregaon Park Rescue of 12 victimized girls seven foreign girls crime pune police
Prostitution in spa center massage parlor in Koregaon Park Rescue of 12 victimized girls seven foreign girls crime pune police esakal

पुणे : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दोन महिन्यांत मसाज पार्लर आणि स्पा सेंटरमध्ये छापा टाकून सात परदेशी तरुणींसह १२ पीडित तरुणींची सुटका केली. या घटनांवरून उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्क परिसरात स्पा सेंटर आणि मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याचे समोर आले आहे.

कोरेगाव पार्क परिसरात स्पा सेंटर आणि मसाज पार्लरचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईवरून ही बाब समोर आली आहे. हेल्थ लॅड क्लिनिक, थाई स्पा व हेल्थ स्पॉट क्लिनिक, थाई स्पा, कोरेगाव पार्क येथे मसाज पार्लरच्या नावाखाली तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

त्यावरून पोलिसांनी १३ मे रोजी स्पा सेंटरमध्ये छापा टाकून तीन परदेशी आणि दोन भारतीय अशा पाच तरुणींची सुटका केली. यापूर्वी एका स्पा सेंटरमधून चार परदेशी तरुणींसह सात तरुणींना ताब्यात घेतले. त्यांची रेस्क्यू फाऊंडेशनमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे,

पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलिस अंमलदार मनिषा पुकाळे, रेश्मा कंक, अजय राणे, सागर केकाण, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

स्थानिक पोलिसांकडून दुर्लक्ष?

कोरेगाव पार्क परिसरात गुन्हे शाखेने दोन महिन्यांत मसाज पार्लर आणि स्पा सेंटरवर छापा टाकून १२ पीडित तरुणींची सुटका केली. त्यामध्ये सात परदेशी तरुणींचा समावेश आहे. या बाबींकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com