थंडीमुळे द्राक्षांना कापडाची झालर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

महाळुंगे पडवळ - आंबेगाव तालुक्‍यात कडाक्‍याची थंडी पडत आहे. कळंब, चांडोली बुद्रुक, महाळुंगे पडवळ, नांदूर, लौकी या गावातील शेतकरी द्राक्ष पिकाची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून संपूर्ण द्राक्ष बागेला शेडनेट किंवा साडीची झालर लावण्यात आली आहे. तसेच द्राक्ष घडांना पेपरने झाकण्यात आले आहे. 

कळंब, महाळुंगे पडवळ, चांडोली बुद्रुक व लौकी या भागात एक एकर ते पाच एकर क्षेत्रात द्राक्ष उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. कळंब हे गाव द्राक्ष बागायतदारांचे गाव म्हणून उदयास आले आहे. या भागात पिकविलेली द्राक्षे बांगलादेश, श्रीलंका, रशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, इंग्लंड आदी देशांत निर्यात केली जातात. तालुक्‍यात एकूण २५० एकर क्षेत्रात द्राक्षपीक आहे. द्राक्षबाग तयार करण्यापासून ते पीक हातात येईपर्यंत लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षबागांना घड लागले आहेत; परंतु मोठ्या प्रमाणात थंडी पडत असल्याने द्राक्ष घडांची फुगवण थांबली आहे. द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेतकरी उपाययोजना करत आहेत, असे प्रमोद कानडे यांनी सांगितले.  

उष्णतेसाठी शेकोट्यांचा आधार... 
कडाक्‍याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांची फुगवण थांबल्यामुळे बागांच्या बाहेर रात्रीच्यावेळी शेकोटी लावण्याची लगबग शेतकरी करत आहेत. त्यामुळे थंडीमुळे खराब होणारे घड वाचविण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक औषध फवारणी केल्यास मण्यांची फार कमी तापमानामध्ये किंवा दुपारच्या जास्त तापमानासाठी सहनशीलता वाढते, असे प्रवीण थोरात पाटील यांनी संगितले.

Web Title: protect against cold shed or saree in the whole grape garden