"ना गिरने देंगे मशीद, ना मंदिर, ना होने देंगे इधर मेट्रो स्टेशन' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पुणे : "ना गिरने देंगे मशीद ना मंदिर, ना होने देंगे इधर मेट्रो स्टेशन' अशा स्वरूपाचे फलक पुण्यातील फडके परिसरात झळकत आहे. महामेट्रोच्या स्थानकाला स्थानिकांचा विरोध असून  स्थानकाच्या मुद्यावरून असंतोषाचे वातावरण आहे. दरम्यान येथील स्थानिक रहिवासी उद्या(गुरूवार) सकाळी 11.30 वाजता ठिय्या आंदोलन करणार आहे. 

metro bord

"ज्या ठिकाणी मेट्रोस्थानक होणार आहे तिथे चारशे वर्षांपूर्वीची शिवकालीन मंदिरे, मशीद आहेत. शिवाय, आठ पिढ्यांपासून राहणाऱ्या लोकांची घरे व दुकाने यामध्ये जाणार आहे. त्यामुळे येथील स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात वैयक्तिक आणि धार्मिक नुकसान होणार आहे.'' असे तेथील नाव न देण्याच्या अटीवर एका स्थानिक सांगितले.
metro
याबाबत अॅड. मोहन मोरे म्हणाले, " या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे स्वागतच आहेच पण, इथे प्रश्‍न सामान्य जनांच्या रोजच्या जीवनशैलीचा व त्यासाठी लागणाऱ्या उदरनिर्वाहाचा आहे.'' एकीकडे शिवाजीनगर ते हिंजवडी या तिसऱ्या प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले, तर दुसरीकडे काही ठिकाणी याबाबतचा विरोध पाहावयास मिळत आहे
metro 2

Web Title: Protest against metro station at Fadake Haud In pune