मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शेतीमाल अोतून सरकारचा निषेध

The protest against the Otur government in the Maratha reservation agitation
The protest against the Otur government in the Maratha reservation agitation

सासवड (जि. पुणे)  -  मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांसाठी पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सासवड (ता. पुरंदर) येथील पालिका चौकातील `शिवतीर्थ`वर बेमुदत लाक्षणिक ठिय्या आंदोलनाचा आज २९ वा दिवस होता. यावेळी पिंपळे व बोरहाळवाडीच्या मराठा बांधवांनी आंदोलनस्थळापर्यंत बैलगाडया, ट्रॅक्टरची रॅली काढली. तसेच बाजारभाव नसल्याने रस्त्यावर शेतीमाल अोतून लक्ष वेधले. 

बहुतेक मराठा बांधव आजही शेती करतो. मात्र शेतीमालास बाजारभाव नाही. त्यामुळे बैलगाडीतून येऊन पिंपळेकरांनी मराठा शेतकऱ्यांची अवस्था दाखविण्याचा प्रयत्न केला. शेतमालाच्या गडगडलेल्या बाजारभावाबाबत रस्त्यावर टोमॅटो, डाळिंब व इतर शेतीमाल ओतून शासनाचे लक्ष वेधले. मुलींबद्दल चुकीचे विधान केलेल्या भाजपा आमदार राम कदम यांचाही यावेळी निषेध नोंदविण्यात आला.

बैलगाड्या, ट्रॅक्टर असा लवाजमा ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आणल्याने कित्येक काळ वाहतुक कोंडी झाली होती. पोलीस यंत्रणा मात्र येथे कमी पडली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला होता. तहसिल कार्यालयावरील मोर्चानंतर.. सासवडच्या या ठिय्या आंदोलनाचा आजचा 29 वा दिवस होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हे ठिय्या आंदोलन येथे सुरु आहे.

यावेळी पिंपळे - बोरहाळवाडीच्या ग्रामस्थांनी व तालुका समन्वय समितीच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांबाबत मनोगत व्यक्त झाले. आरक्षण मिळेपर्यंत येथील आंदोलन सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी अनेक युवक व शेतकऱ्यांनी शेतमालाच्या मातीमोल बाजारभावाबाबत तीव्र भावना मांडल्या. दरम्यान, आंदोलनस्थळी नंतर दिवसभर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भजन आंदोलन सुरुच आहे. उद्या शुक्रवारी (ता. ७) आंदोलनाच्या ३० व्या दिवशी साकुर्डे गावातील मराठा बांधव सहभागी होणार असल्याचे समन्व्य समितीच्याकडून सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com