देशातील वाढत्या महागाईचा निषेध; पुण्यात मोदी महागाई बाजार भरवीत आंदोलन

मोदीजी, महागाईचा बाजार उठवा, नाहीतर जनता तुमचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.
Protest against rising inflation in country Modi inflation Pune ncp
Protest against rising inflation in country Modi inflation Pune ncpSakal

पुणे : देशातील वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने बुधवारी (ता.१५) पुण्यात मोदी महागाई बाजार भरवीत आंदोलन करण्यात आले. शहरातील जंगली महाराज रोड परिसरात भरविण्यात आलेल्या या बाजारात भाजीपाला, फळे, फुले,पुस्तके, किराणा, चहा, वडापाव, मासे आदींची दुकाने उभारण्यात आली होती. यावेळी मोदीजी, महागाईचा बाजार उठवा, नाहीतर जनता तुमचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.

सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. यामुळे यावर्षीचा महागाईचा उच्चांक मोडीत निघाला असून या आठवड्यात घाऊक महागाई दर १५.८८ वर गेला आहे. गेल्या ९ वर्षांतील हा महागाई दराचा उच्चांक ठरला आहे. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशावर ही कठीण परिस्थिती देशावर ओढवली आहे. याचा निषेध करण्यासाठी हा मोदी महागाई बाजार भरविण्यात आल्याचे या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोदी सरकारच्यावतीने अत्यावश्यक सेवेसह जीवनावश्यक वस्तूंच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ केली जात आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेसह किरकोळ विक्रेत्यांनादेखील बसला आहे. जनता दिवसेंदिवस महागाईच्या ओझ्याखाली दबत असताना आता व्यापारी आणि विक्रेत्यांवरही महागाईची ही संक्रांत ओढवली असल्याचे या पत्रकात नमूद केले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख , उदय महाले, वनराज आंदेकर, अजिंक्य पालकर, वैशाली थोपटे, सदानंद शेट्टी, रूपाली ठोंबरे, मनिषा होले आदींसह पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी’चे तुकाराम महाराजांना साकडे

श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण न करू दिल्यामुळे राजशिष्टाचाराचा भंग झाला आहे. शिवाय यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा अपमान झाला आहे. त्यामुळे या घटनेचा बुधवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करून निषेध करण्यात आला. शहराध्यक्ष किशोर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम महाराज पादुका चौकात आंदोलन करून पंतप्रधान कार्यालयाचा व भाजपचा भजन, अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. यावेळी किमान यापुढे तरी यापुढे तरी त्यांना सुबुद्धी लाभो, असे संत तुकाराम महाराजांना साकडे घालण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com