गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

वकिलांकडून निषेध 
हैदराबादमधील डॉक्‍टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना नुकतीच घडली. पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील वकिलांकडून सोमवारी या घटनेचा निषेध करण्यात आला. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) वकिलांनी या घटनेचा निषेध केला. पीबीएचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत आगस्ते, ॲड. राहुल कलाटे, शिरीष शिंदे, एन. डी. पाटील, सागर नेवसे, सचिन हिंगणेकर, अनिषा फणसळकर आदी उपस्थित होते.

पुणे - हैदराबादमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

शहर जिल्हा महिला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा महिला आघाडी, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय मराठा महासंघ, राजपूत समाजसेवा विकास मंच, भीम आर्मी, साजिर प्रतिष्ठान, रिपब्लिकन बहुजन परिषद, सामर्थ्य जनशक्‍ती, यंग पृथ्वी फाउंडेशन यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देण्यात आले. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest for criminal hanging demand