अग्निपथ योजना रद्द करण्यासाठी जुन्नरला तहसील कार्यालयासमोर निदर्शने

अग्निपथ योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सोमवार ता.२० रोजी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
protest in front of Junnar tehsil office to cancel Agnipath scheme pune
protest in front of Junnar tehsil office to cancel Agnipath scheme punesakal

जुन्नर : अग्निपथ योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सोमवार ता.२० रोजी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. नायब तहसीलदार शांताराम किर्वे व पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. डीवायएफआयचे गणपत घोडे यांनी अग्निपथ योजना रद्द करून जुन्या सैन्य भरती पद्धतीने सैन्यातील रिक्त जागा भरल्या जाव्यात. सैन्यदलातील रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरून देशसेवेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैन्याची आर्थिक जबाबदारी न घेता त्यापासून पळ काढण्याचा हा चुकीचा प्रकार आहे.

एसएफआयचे राज्य सचिव मंडळ सदस्य विलास साबळे म्हणाले, सरकार सैन्य भरतीतील वीरांच्या गरजा, पगार, पेन्शन, सुविधा, यात सुधारणा न करता बे- भरावशाची अग्निपथ कंत्राटी भरती आणली आहे. तरुणांना चार वर्षानंतर नोकरी गेल्याने नव्या नोकरीचा शोध घ्यावा लागेल.

राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंचाचे प्रा. संजय साबळे म्हणाले. गेल्या चार वर्षापासून नोकर भरती न झाल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. सरकारने शासकीय तसेच विशेष आदिवासी पदभरती प्रक्रिया सुरु करून तरुणांमधील असंतोष कमी कारवा.

यावेळी प्रवीण सोनवणे, दादाभाऊ साबळे, जनवादी महिला संघटनेच्या रूपाली रघतवान, एसएफआय चे तालुका अध्यक्ष अक्षय साबळे, प्रविण गवारी, गणेश चिमटे, भूषण पोफळे, सोमनाथ पडवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com