Protest March : गोरक्षकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जुन्नरला निषेध मोर्चा

जुन्नर शहरातील भरवस्तीत जमावाने गोरक्षकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज गुरुवार ता. ०८ रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला तसेच शहरात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला.
Protest March in Junnar
Protest March in Junnarsakal
Summary

जुन्नर शहरातील भरवस्तीत जमावाने गोरक्षकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज गुरुवार ता. ०८ रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला तसेच शहरात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला.

जुन्नर - जुन्नर शहरातील भरवस्तीत जमावाने गोरक्षकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज गुरुवार ता. ०८ रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला तसेच शहरात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा,सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक संस्था, बँका वगळता व्यापारी, तसेच दैनंदिन भाजी विक्रेते यांनी देखील आपला व्यवसाय पूर्ण बंद ठेवत पाठींबा दिला.

जुन्नरच्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे शहर व परिसरातील गोरक्षक, शिवभक्त मोठ्या संख्येने जमा झाले येथून निषेध मोर्चाची सुरवात होऊन तहसील कार्यालयाच्या आवारात सांगता झाली. यावेळी अखिल भारत कृषी गो सेवा संघ पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी, भाजपा नेत्या आशा बुचके, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व दुर्ग संवर्धक श्रमिक गोजमगुंडे, संतोष खामकर, मधुकर काजळे, अरुण कबाडी, सुनिल काळे, शिवराज संगनाळे, मयुर दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवजन्मभूमीत गोहत्या करून पावित्र्य बिघडवू पाहणारे तसेच महिलांची छेडछाड करणाऱ्या शक्तीच्या विरोधात कठोर भूमिका घेऊन त्यांना धडा शिकविण्यात येईल. हल्ल्यातील आरोपींना पोलीस प्रशासनाने त्वरित अटक करावी अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मिलिंद एकबोटे यांनी यावेळी बोलताना दिला.

जुन्नर शहरात संपूर्ण गोवंश बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी,लव्ह जिहाद निर्बंध कायदा लागू करावा, धर्मांतर बंदी,शेतकऱ्यांच्या गाई, बैल चोरी करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई, संवेदनशील शहर म्हणून अधिकची पोलीस चौकी उभारावी आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, तहसिलदार रवींद्र सबनीस यांना देण्यात आले.

जुन्नरच्या मध्यवस्तीत शुक्रवार ता.२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झालेल्या या घटनेने शहर व परिसरात खळबळ उडाली होती. गोरक्षक शिवराज विश्वनाथ संगनाळे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पोलीसांनी २७ जणांविरुद्ध विविध कलामांन्वये गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी आत्तापर्यत एकूण २२ आरोपी निष्पन्न झाले असून पोलीसांनी मुख्य आरोपी माजिद कुरेशी यांचेसह बुधवार ता.७ पर्यत सहा आरोपीना अटक केली आहे. त्यांना सोमवारपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com