MPSC विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर; युवक काँग्रेसतर्फे पुण्यात आंदोलनाची हाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

MPSC विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर; युवक काँग्रेसतर्फे पुण्यात आंदोलनाची हाक

युवक काँग्रेसतर्फे पुण्यात पुन्हा एमपीएसी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी 10 वाजता बालगंधर्व चौक येथे एमपीएससी निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थिती राहणार आहेत.

एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याबाबत आयोगाने अंबलबजावणी केली नाही म्हणून विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन पुकारले आहे.

काही दिवसांपूर्वी शेकडो विद्यार्थ्यांनी पुण्यातील टिळक चौकात नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांनी देखील सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांच्या मागील आंदोलनावेळी मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू होईल असं जाहीर केलं होतं. मात्र, याची अंबलबजावणी आणि ठोस भूमिका आयोगाने घेतली नसल्याने विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.

टॅग्स :MPSC Exam Student