पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे - केंद्र सरकारकडून सातत्याने केल्या जात असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पूरम चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी दुचाकीला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या.

पक्षाच्या शहराध्यक्ष व खासदार ऍड. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नगरसेवक रवींद्र माळवदकर, शहर उपाध्यक्ष अशोक राठी, सुनील खाटपे, स्वप्नील खडके, युवती अध्यक्ष मनाली भिलारे, युवक अध्यक्ष राकेश कामठे आदी उपस्थित होते.

ऍड. चव्हाण म्हणाल्या, 'आंतरराष्ट्रीय पातळीवर पेट्रोल-डिझेलचे दर कमी असताना भाजप सरकारला दरवाढ आटोक्‍यात आणता आली नाही. आता तर सर्वाधिक दराने पेट्रोल-डिझेलची विक्री होत आहे. भविष्यात सर्वांत जास्त इंधन दर असणारा देश म्हणून भारत विक्रम प्रस्थापित करेल. दुसरीकडे इंधन पुरवठादार देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना भविष्याचा वेध घेऊन मुबलक इंधनाची तरतूद होणे आवश्‍यक आहे. त्याकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे.''

Web Title: protest to petro diesel rate