जेएनयू आंदोलनाचे पुण्यात पडसाद; विद्यापीठात तशाच मागण्यांसाठी निदर्शने

protest in pune university after lathi charge on jnu students in delhi
protest in pune university after lathi charge on jnu students in delhi

पुणे : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. 
फुले विद्यापीठाच्या परिसरात ही निदर्शने करण्यात आली. 

काय आहेत पुण्यातील मागण्या?
जेएनयूमध्ये वसतीगृहाचे वाढविलेले शुल्क कमी करावे, ग्रंथालय 24 तास खुले असावे यासह अन्य मागण्यांसाठी निदर्शने सुरू असताना तेथे बळाचा वापर करण्यात आला. हे आंदोलन हताळण्यात प्रशासनाला अपयश आले आहे, याचा पुणे विद्यापीठातील विविध संघटनांच्या विद्यार्थ्यांनी निषेध केला. पुणे विद्यापीठाने वसतीगृहाचे वाढविलेले शुल्क कमी करावे, जयकर ग्रंथालय 24 तास खुले करावे, कमवा शिका योजनेत प्रतितास 60 रुपये विद्यार्थ्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

"जेएनयू'तील मोर्चेकरी विद्यार्थ्यांविरुद्ध "एफआयआर' 
नवी दिल्ली : वसहतीगृहाच्या शुल्कवाढीच्या विरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला.  जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनप्रकरणी किशनगंज पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. मात्र, एफआयआरबाबत अधिक माहिती देण्यास या अधिकाऱ्याने नकार दिला. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरप्रकरणी जेएनयू विद्यार्थी परिषदेकडून (जेएनयूएसयू) लगेचच कुठलीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. भरमसाट करण्यात आलेली शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी करत जेएनयूच्या हजारो विद्यार्थ्यांनी सोमवारी रस्त्यावर उतरत मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. या आंदोलनामुळे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील काही भागांतील रस्ते ठप्प झाले होते. शुल्कवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी तीन आठवड्यांपासून जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू आहे.

आणखी बातम्या वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com