कल्याणकारी योजना सुरू ठेवा; सोशलिस्ट पार्टीचे महापालिकेसमोर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

पुणे : महापालिकेने 2018-19 च्या अर्थसंकल्पात जनतेच्या कल्याणकारी योजनांवरील तरतूद कमी केली आहे. तसेच, बंद केलेल्या कल्याणकारी योजना सुरू करून तरतूद वाढवावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोशलिस्ट पार्टी इंडिया, देश बचाव आघाडी, लोकायत, सोशलिस्ट युवजन सभा या संघटनांच्या वतीने महापालिकेसमोर शनिवारी सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. 

शहरात रस्ते, उड्डाण पूल, मेट्रो अशा विकासकामांवर अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. त्यावरील कराचा बोजा सामान्य नागरिकांवर लादण्यात येणार आहे; परंतु पालिकेने आरोग्य, शिक्षण, वाहतूक सुविधा, महिला व बालकल्याण योजनांवरील खर्चात कपात केली आहे. नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हे सरकारचे कर्तव्य असून, कल्याणकारी योजनांवरील खर्चात वाढ करण्यात यावी, अशी मागणी सोशलिस्ट पार्टीचे ऍड. संतोष म्हस्के, श्रीकृष्ण कुलकर्णी, अलका जोशी आदींनी या वेळी केली. 

संघटनांच्या मागण्या : 

  • पालिकेने कल्याणकारी योजनांवरील खर्च वाढवावा 
  • महिला स्वच्छतागृहांच्या संख्येत वाढ करावी 
  • कल्याणकारी योजनांसाठी पाच टक्‍के निधी राखीव ठेवावा 
  • सामान्यांना परवडेल असे बसचे भाडे असावे 
  • पालिकांच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात 
  • विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीसाठी पुरेशी तरतूद करावी
Web Title: Protests in front of Pune Municipal Corporation