आता भविष्य निर्वाह निधी दाव्यांचा ऑनलाइन निपटारा

PF
PF

पुणे - एका कंपनीतून नोकरी सोडून दुसऱ्या ठिकाणी नोकरीला रुजू झाल्यानंतर पूर्वीच्या कंपनीमधील भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड - पीएफ) खात्यातील पैसे काढण्याच्या कटकटीपासून आता सुटका झाली आहे. कारण भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढणे, तसेच अन्य खात्यावर जमा करण्याचे दावे, आधार कार्ड व "युनिव्हर्सल अकाउंट नंबर' (यूएएन) जोडणीनंतर एका क्‍लीकवर ऑनलाइन निकाली काढण्यास सुरवात झाली आहे. यामध्ये जानेवारीपासून आजपर्यंत पुणे विभागामध्ये 78 टक्के दावे निकाली काढण्यात आल्याची माहिती भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून देण्यात आली.

यासंदर्भात पुणे एकचे प्रादेशिक भविष्य निर्वाह आयुक्त अरुण कुमार म्हणाले, 'कंपनी बदलल्यानंतर जुन्या कंपनीच्या पीएफ खात्यातील रक्कम काढणे ही पूर्वी डोकेदुखी होती. अनेक कागदपत्रे आणि संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागत होते. परिणामी, जुन्या कंपनीच्या पीएफ खात्यातील रकमा विनाकारण पडून होत्या. त्यावर कामगार मंत्रालयाकडून धोरणात्मक निर्णय घेत प्रत्येक पीएफ खात्यांना आधारजोडणीसह "युनिव्हर्सल अकाउंट नंबर' (यूएएन) जोडणी करणे बंधनकारक केले. त्यामुळे कोणतीही व्यक्ती स्वतः ऑनलाइन यूएएन टाकून त्याची रक्कम इच्छित खात्यावर जमा करू शकते.''

येत्या दोन ऑक्‍टोबरपासून शंभर टक्के ऑनलाइन प्रक्रिया - कुमार
'पुणे विभागातील 48 टक्के पीएफ खात्यांना आधार कार्ड क्रमांक व यूएएन जोडणी झाली असून, उर्वरित 52 टक्के खात्यांना जोडणीचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे ज्या कामगारांची जोडणी अद्याप झालेली नाही त्यांना तत्काळ जोडणी करणे बंधनकारक आहे. येत्या 2 ऑक्‍टोबरपासून शंभर टक्के ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ''
- अरुण कुमार, प्रादेशिक भविष्य निर्वाह आयुक्त, (पुणे 1)

पुणे विभागाची पीएफ दाव्यांची आकडेवारी
(स्रोत - भविष्य निर्वाह निधी संघटना, भारत सरकार)

- एकूण दावे - 3,81,440
- निकाली दावे - 2,97,037
- नाकारलेले दावे - 61,550

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com