गुन्ह्याच्या तपासासाठी लखनौत गेलेल्या पीएसआय अजय म्हेत्रे यांचे ह्रदयविकाराने निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

पुणे : लखनौ येथे तपासाठी गेलेल्या पुण्यातील गुन्हे शाखा यूनिट 3 मधील उपनिरिक्षक अजय म्हेत्रे यांचे ह्रदयविकाराच्या झट्क्याने निधन झाले आहे.

पुणे : लखनौ येथे तपासाठी गेलेल्या पुण्यातील गुन्हे शाखा यूनिट 3 मधील पोलिस उपनिरिक्षक अजय म्हेत्रे यांचे ह्रदयविकाराच्या झट्क्याने निधन झाले आहे.

समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी गेले असता काल रात्री ११ च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल केले पण तो पर्यंत म्रुत्यू झाला होता.  

म्हेत्रे हे २०१३ च्या बॅचचे पीएसआय असून,  ते सध्या मगरपट्टा परिसरात राहात होते.  
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच गुन्हे शाखेतील अधिकारी लखनऊला गेले. त्यांचे पार्थिव आज पुण्यात आणले जाणार आहे.
 

Web Title: PSI Ajay Mhetre passed away in Lucknow due to heart attack

टॅग्स