मावळ डान्सबारमधील गोळीबारात पीएसआय जखमी

firing-1.jpg
firing-1.jpg

पुणे : वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीत काल (ता.8) रात्री फ्लेवर्स हॉटेल साते येथे दोन गटांमध्ये जोरादार भांडण चालु असल्याचे वृत्त होते. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस निरिक्षक नितिन मोहीते यामध्ये जखमी झाले आहेत. 

वङगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीत ता. 8 मार्चला 11.45 वाजताचे सुमारास फ्लेवर्स हॉटेल साते येथे भांङण चालु असल्याबाबत पोलिस निरिक्षक नितिन मोहीते यांना
समजले. ते सदर ठिकाणी स्टाफसह गेले असता माहिती मिळाली की, हॉटेल पार्किंगमध्ये इसम नाव मनोज सिध्दाय्या तेलगु (वय 29) व त्यांचे मित्र (रा देहुरस्ता पुणे) याचा आरोपी नामे दादा बाळु ठवळे (वय 38 रा.पुनावळे ता.हवेली) व त्याचे इतर 2 साथीदार यांच्यात वाद झाला होता.

सदर आरोपी हे हॉटेल मध्येअसून त्यांच्याजवळ हत्यार असल्याचे समजले पोलिस निरिक्षक नितिन मोहीते हे त्याला ताब्यात घेण्यासाठी हॉटेलच्या आत गेले असता सदर आरोपीने त्यांच्या कमरेला लावलेले रिव्हालवर काढुन पोलिस निरिक्षक मोहीते यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर गोळी झाडली.  जखमी मोहिते यांना तळेगाव सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये आणले असुन उपचार चालु आहेत.  

सदर प्रकणातील 3 आरोपी दादा ढवळे व सुनील पालखे व संतोष गायकवाड यांना हत्यारारसह ताब्यात घेतले आहे. या आरोपींवर वडगाव मावळ पोलिसा ठाण्यात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरु आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com