ऑक्‍सिजन न्या घरोघरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

कात्रज (पुणे) : वाढते औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे वाढणारे प्रदूषण मानवी आरोग्याला घातक ठरत आहे. पर्यावरणात मिसळणारा कार्बनडायॉक्‍साइड शोषून फुकटात शुद्ध ऑक्‍सिजन देणारी झाडे प्रत्यकाने लावून आपले आरोग्य जपले पाहिजे, हा संदेश देण्यासाठी डॉ. नीलेश गुजर यांनी पुढाकार घेतला आहे. "न्या ऑक्‍सिजन घरोघरी'चा संदेश देत प्रत्येक रुग्णाला मोफत रोपे देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 

 

कात्रज(पुणे) : वाढते औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे वाढणारे प्रदूषण मानवी आरोग्याला घातक ठरत आहे. पर्यावरणात मिसळणारा कार्बनडायॉक्‍साइड शोषून फुकटात शुद्ध ऑक्‍सिजन देणारी झाडे प्रत्यकाने लावून आपले आरोग्य जपले पाहिजे, हा संदेश देण्यासाठी डॉ. नीलेश गुजर यांनी पुढाकार घेतला आहे. 'न्या ऑक्‍सिजन घरोघरी'चा संदेश देत प्रत्येक रुग्णाला मोफत रोपे देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 

सुखसागरनगर, राजीव गांधीनगर, अप्पर इंदिरानगरला वरदान ठरलेली डॉ. गुजर यांची वैद्यकीय सेवा पर्यावरण व सामाजिक भान निर्माण करत आहे. प्रदूषण हेच अनारोग्याचे प्रमुख कारण आहे. केवळ औषधोपचाराने अनारोग्यावर मात करता येणार नाही. प्रदूषणावर मात करताना पर्यावरणास बळ देण्यासाठी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले पाहिजे; अन्याथा भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, याची जाणीव करून देण्याचे काम डॉ. गुजर करत आहेत. सर्वसामान्य वसाहतीतील 
रुग्णांची गर्दी डॉ. गुजर यांच्या दवाखान्यात असते. 'न्या ऑक्‍सिजन घरोघरी' या शिर्षकाचा फलक डॉक्‍टरांनी क्‍लिनिकमध्ये लावला आहे. पहिल्या दहा रुग्णांना ते मोफत रोपे देतात. त्याचवेळी ते प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम पटवून सांगतात.

प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षारोपणाचा ते आग्रह करतात. डॉ गुजर म्हणाले, 'मानवी आरोग्य हे पर्यावरणावर अवलंबून आहे. लोकसहभागाशिवाय पर्यावरण संवर्धन अशक्‍य आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी, यासाठी प्रत्येकाने आपापल्या 
पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. वृक्ष लागवडीचे महत्त्व डॉक्‍टर जेव्हा रुग्णाला सांगतो त्या वेळी तो निश्‍चित कृती करतो. पुन्हा फिरून तो रुग्ण येतो तेव्हा. मी त्यांना रोपांच्या वाढीबाबत चौकशी करतो. परिणामी वृक्ष लागवड आणि त्याचे संगोपन या पर्यावरण संवर्धनासाठी आवश्‍यक असलेले काम होते. 

 

Web Title: Public awareness by giving free plant to every patient