बाल तस्करी व बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी जनजागृतीची गरज; डॉ. अभिनव देशमुख

बाल तस्करी हा फार मोठा सामाजिक प्रश्न आहे. त्यामध्ये कायद्याचा बडगा दाखवून हा प्रश्न सुटणारा नाही. संवेदनशीलपणा दाखवून सामाजिक दृष्टीकोनातून हा प्रश्न सोडविण्यासाठी जनजागृतीची गरज
public awareness to prevent Child trafficking and child sexual abuse police Abhinav Deshmukh
public awareness to prevent Child trafficking and child sexual abuse police Abhinav Deshmukhsakal

मंचर : “बाल तस्करी हा फार मोठा सामाजिक प्रश्न आहे. त्यामध्ये कायद्याचा बडगा दाखवून हा प्रश्न सुटणारा नाही. संवेदनशीलपणा दाखवून सामाजिक दृष्टीकोनातून हा प्रश्न सोडविण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. देश पातळीवर काम करणार्या कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन नवी दिल्ली (नोबेल पुरस्कार विजेते) व मंचर (ता.आंबेगाव) येथील ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने एकत्रितपणे बाल तस्करीचे प्रकार रोखण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. याकामी पोलीस यंत्रणेकडून सहकार्य केले जाईल.”असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सांगितले.

पुणे-पाषाण येथे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक मुख्यालयात “बाल लैंगिक शोषण व बाल तस्करी प्रकरणे हाताळणे व कायदे" या विषयावर पुणे ग्रामीण विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी डॉ.देशमुख बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गार्गी काळे पाटील, कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशनच्या व्यवस्थापक हेमंती कुमार, पोलीस निरीक्षक कल्याण शाखा अविनाश शिळीमकर, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विजय सिह चोहान, पुणे ग्रामीण भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख, कैलाश सत्यार्थीच्या प्रकल्प अधिकारी दीक्षा यादव उपस्थित होत्या.

प्रशिक्षक प्रेमोद्य खाखा यांनी पोक्सो व न्याय बाल कायदा या विषयांवर प्रशिक्षण दिले. उपस्थित प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. अँड.ज्योती खेसे,अँड.सुरेखा कांबळे, सहाय्यक अधिकारी रुपाली डांमसे यांनी व्यवस्था पहिली.

“बाल तस्करी या प्रश्नाकडे दुर्लक्ष होता कामा नये. बसस्थानक, रेल्वे स्थानक, हॉटेल, ढाब्यावर किंवा सिग्नलवर लहान मुले दिसतात. त्याला इथे कोणी आणले असेल. हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे.चौकस बुद्धीने विचारपूस केली पाहिजे. त्यातूनच बाल तस्करीचे प्रकार उघडकीस आणण्यास व रोखण्यास मदत होईल. याकामी ग्रामीण सर्व पोलीस ठाण्यात ज्ञानशक्ती व कैलाश सत्यार्थी संस्थेची मदत घेतली जाईल.”

- डॉ.अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com