मांजरी पालिकेचा कचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती

कृष्णकांत कोबल
शुक्रवार, 22 जून 2018

साडेसतरा नळी परिसरात आरोग्य निरीक्षक इसाक शेख स्वच्छच्या समन्वयक सुवर्णा इभाड यांच्या मार्गदर्शनाखाली हातात फलक घेऊन जनजागृती रँली काढण्यात आली होती.

मांजरी - पालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना सध्या कचरा व्यवस्थापनाचे धडे देण्याचे काम सुरु आहे. पालिकेचा आरोग्य विभाग व स्वच्छ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या गावांमध्ये रॅली काढून त्याबाबत जनजागृती केली जात आहे.

साडेसतरा नळी परिसरात आरोग्य निरीक्षक इसाक शेख स्वच्छच्या समन्वयक सुवर्णा इभाड यांच्या मार्गदर्शनाखाली हातात फलक घेऊन जनजागृती रॅली काढण्यात आली होती. ओला, सुका कचरा वेगळा ठेवावा, परिसराची स्वच्छता राखावी असा संदेश या रॅलीतील कार्यकर्त्यांनी नागरिकांना दिला. 

कार्यकर्ते भाऊसाहेब आटोळे, अशोक आटोळे, सुनील धांदे, सागर साळुंखे, समन्वयक मनिषा निंबाळकर, शिल्पा तावरे, कविता पाटील, अनिता टिळेकर, रेखा उम्रटकर, दिपाली क्षीरसागर, तौफिक शेख यांनी घरोघर संवाद साधून स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाचे महत्व पटवून दिले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Public awareness for waste management at manjari

टॅग्स