वाहनांच्या आरसी बुकबाबत नागरिकांच्या तक्रारींचा पाढा

RC-Book
RC-Book

पिंपरी - सात वर्षांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहन चालविण्याचा परवाना, आरसी बुक टपाल कार्यालयामार्फत देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली. मात्र अनेक कारणांमुळे अद्यापही अनेक नागरिकांना तब्बल एक ते दोन वर्ष आरसी बुक मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहननोंदणी, वाहनचालविण्याचा परवाना काढणे यासारख्या कामांसाठी अनेक नागरिक रोज येत असतात. नागरिकांचा वेळ वाचावा यासाठी २०१२ मध्ये टपाल कार्यालयामार्फत वाहन चालविण्याचा परवाना आणि आरसी बुक पाठविण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. या सेवेच्या दर्जाबद्दल नागरिकांच्या तक्रारी होत्या. ज्या नागरिकांना टपालाने ही परवाना आणि आरसी बुक मिळत नाही, त्यांना टपाल कार्यालयात जावे लागते. 

यासंदर्भात चिंचवड येथील सुरेश खिंवसरा यांनी सांगितले, ‘‘मी दोन वर्षांपूर्वी दुचाकी विकत घेतली. मात्र, अद्याप मला आरसी बुक मिळाले नाही. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, टपाल कार्यालय येथे चार ते पाच वेळा चकरा मारल्या. मात्र, काहीही उपयोग झाला नाही.’’ कार्यालयाने दोन महिन्यांसाठी अभय योजना राबवावी. त्यानुसार ज्यांना त्यांचे परवाने, आरसी बुक मिळाले नाहीत त्यांनी कार्यालयातून घेऊन जाण्याचे आवाहन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com