इंदापूरबाबत झाला मोठा निर्णय; मंत्री भरणे म्हणतात...

डॉ. संदेश शहा
Thursday, 10 September 2020

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवून कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण इंदापूर तालुक्यात (ता. १२ ते २० सप्टेंबर) या कालावधीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

इंदापूर : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवून कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण इंदापूर तालुक्यात (ता. १२ ते २० सप्टेंबर) या कालावधीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षते खाली इंदापूर शासकीय विश्रामगृहातव्यापारी, शेतकरी, प्रशासनाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊनमध्ये पेट्रोल पंप सकाळी ९ ते दुपारी २, दुध सकाळी ६ ते ९ पर्यंत तर दवाखाने व मेडिकल या अत्यावश्यक सेवा उपलब्ध राहणार आहेत.

भरणे पुढे म्हणाले, तालुक्यातीलकोरोना रुग्णांची संख्या 1200 हुन जास्तझालीअसून ही साखळी तोडण्यासाठी संपुर्ण लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाची समूह साखळी तोडण्यासाठीजनतेने  शासन सूचना व स्वयंशिस्त शंभर टक्के पाळणे गरजेचे आहे. या काळातप्रशासनाच्या वतीने जे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यास नागरिकांनी सहकार्य करावे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर म्हणाले, कोरोना विषाणूमुळे होणारा हा आजार जीवघेणा नाही मात्र सर्वांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. जनता कर्फ्यू हा या आजारापासून बचाव करण्यासाठी असून   शहरात कोविड सेंटर प्रशासन व नागरिकांनी एकत्र येऊन व्यवस्थितपणे चालवू अशी ग्वाही त्यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या, ''या आजारात पहिले तीन महिने शहरात एकही रुग्ण नव्हता मात्र त्यानंतर बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे शहरात या आजाराची सुरुवात झाली. प्रत्येकाने बाहेर पडताना मास्कलावून स्वतः स्वतःचे रक्षण करावे.''

यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, तहसिलदार सोनाली मेटकरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, नगपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, अनिल राऊत, बिभिषण लोखंडे, राकेश गानबोटे, उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ.एकनाथ चंदनशिवे, डॉ. सुहास शेळके, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, विशाल बोन्द्रे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, डॉ. सागर दोशी, डॉ. मंगेश पाटील, महादेव सोमवंशी उपस्थित होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public curfew in Indapur taluka from 12 to 20 September