बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उद्या जाहीर मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

public meeting of balasahebanchi shiv sena party on sunday pune

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उद्या जाहीर मेळावा

पुणे : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा येत्या रविवारी (ता.४) पुणे शहरात जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पक्षाच्यावतीने पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. शिवाय अन्य पक्षातील काही पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचे या पक्षाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी सांगितले.

हा मेळावा नाना पेठेतील महात्मा फुले हायस्कूल (अहिल्याश्रम) येथे रविवारी दुपारी चार वाजता होणार असून, या मेळाव्याला कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नरेश म्हस्के आदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पुणे शहरातील समस्या आणि प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचेही भानगिरे यांनी यावेळी सांगितले.