मांजरी - जयवंतराव सावंत तंत्रनिकेतनमध्ये कॉलेज ब्लॉगचे प्रकाशन

mnjri
mnjri

मांजरी - हांडेवाडी येथील जयवंतराव सावंत तंत्रनिकेतनमध्ये कॉलेज ब्लॉग २ के १८ चे प्रकाशन जेष्ठ कवी नारायण सुमंत यांच्या हस्ते झाले. यामध्ये कॉलेज ब्लॉगमध्ये भित्तीपत्रक व फेसबुक पेजचा समावेश आहे. 

प्राचार्य डॉ. सुभाष देवकर म्हणाले, "कॉलेज ब्लॉग हे मुलांसाठी नुसते भित्तीपत्रक नसून कला गुणांना वाव देण्याचे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात हा ब्लॉग महत्वाची भूमिका बजावेल.' 

यावेळी कवी सुमंत यांनी वारी ते बारी हा एकपात्री कार्यक्रम सादर केला. विद्यार्थ्यांनी त्याला उत्साहात प्रतिसाद दिला. सुमंत यांनी मुलांना हास्यातून जीवन उपदेश केले.

प्रा. राजेश मकवाना, प्रा. पूर्वा कदम, प्रकाश धुमाळ, प्रा. विलास नवले, सोमेश्वर ढगे, प्रा. वैभव तुरे, प्रा. गजेंद्र होले, प्रा. चेतन पाटील, प्रा. विकास बुरगुटे, आदी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी कुणाल सरडे, ऋतिका गायकवाड, रोहित बरांगुळे, प्रसाद काटे, पार्थ ठाकूर यांनी संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com