‘कांगारू’च्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

पुणे - ‘सकाळ’चे क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी लिहिलेल्या ‘कांगारू’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन शनिवारी (ता. १३) होत आहे. लेले यांनी आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे सात दौरे केले आहेत. या दौऱ्यांदरम्यान आलेल्या विविध अनुभवांवर आधारित हे पुस्तक आहे. 

भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियातील क्रिकेट लढतींवर खास भाष्य आणि सर डॉन ब्रॅडमन यांच्या आठवणीही या पुस्तकाची खास वैशिष्ट्ये आहेत.
पर्यटकांना असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या आकर्षणाबद्दलही लेले यांनी ‘कांगारू’ पुस्तकातून भाष्य केले आहे. 

ऑस्ट्रेलियन नागरिकांचे क्रीडाप्रेम, त्यांचा खेळाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन, याची गमतीदार उदाहरणेही या पुस्तकात मांडण्यात आली आहेत. वेगळ्या ढंगाचे फोटो हेसुद्धा ‘कांगारू’चे आकर्षण असणार आहे. ‘सकाळ प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध होणारे लेले यांचे हे तिसरे पुस्तक असून ‘लागू बंधू’ या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

Web Title: The publication of the English version of 'Kangaroo'