‘पुलस्त्य’ महोत्सवात विज्ञानाच्या गमतीजमती

आयुका, पुणे विद्यापीठ - पुलस्त्य विज्ञान महोत्सवात प्रात्यक्षिक सादर करताना विद्यार्थी आणि कार्यकर्ते.
आयुका, पुणे विद्यापीठ - पुलस्त्य विज्ञान महोत्सवात प्रात्यक्षिक सादर करताना विद्यार्थी आणि कार्यकर्ते.

पुणे - विद्यार्थ्यांची गर्दी, त्यांची कुतूहलता, विज्ञानाच्या पडत असलेल्या प्रश्‍नांना तज्ज्ञांकडून मिळत असलेले मार्गदर्शन अन्‌ ‘आयुका’मधील ग्रह-ताऱ्यांची संगत... अशा वातावरणात ‘पुलस्त्य विज्ञान महोत्सवाला’ बुधवारी प्रारंभ झाला. हा महोत्सव ८ नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुला आहे. 

पु. ल. देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीता देशपांडे यांचे जीवन आणि त्यांनी आयुकाला दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी पुलस्त्य विज्ञान महोत्सव होतो. देशपांडे दांपत्याने सामान्य लोकांपर्यंत विज्ञान पोचवण्यासाठी आयुकाला मदत केली. त्यांच्या देणगीतूनच मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र उभे राहिले, याला उजाळा देण्यात आला.  

चंद्रशेखर सभागृहात या महोत्सवाची सुरवात ‘आयुका’चे संस्थापक डॉ. जयंत नारळीकर यांच्या कार्याची चित्रफीत दाखवून झाली. या महोत्सवासाठी सहावी ते दहावीतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आकर्षक वैज्ञानिक प्रात्यक्षिके, सूर्यग्रहणाबद्दल माहिती आणि आयुकातील शास्त्रज्ञांबरोबर प्रश्नोत्तरे ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमात सुमारे १० शाळांचा सहभाग आहे. विज्ञान रंजक आणि आकर्षक पद्धतीने अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यात यावे, असा पुलंचा आग्रह होता, असे प्रतिपादन डॉ. नारळीकर यांनी चित्रफितीच्या माध्यमातून केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com