द. मा. मिरासदार यांना "पुलोत्सव जीवनगौरव' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

पुणे - आपल्या खुमासदार कथांद्वारे प्रत्येकाला खळखळून हसविणारे ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना यंदाचा "पुलोत्सव जीवनगौरव' पुरस्कार जाहीर झाला आहे. तर आपल्या जादुई आवाजातून श्रोत्यांच्या मनावर भुरळ घालणारे आकाशवाणीचे निवेदक अमीन सयानी यांना "पुल स्मृती सन्मान' देऊन गौरविण्यात येणार आहे. 

आशय सांस्कृतिकतर्फे 10 ते 13 नोव्हेंबरदरम्यान "पुलोत्सव' आयोजित केला आहे. पुलोत्सवातील महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. 

पुलोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 10) सायंकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे. या वेळी पुरंदरे यांच्या हस्ते मिरासदार यांना "पुलोत्सव जीवनगौरव' देऊन सन्मानित केले जाणार आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना "पुलोत्सव तरुणाई' पुरस्कार दिला जाईल. पुरस्कार वितरणानंतर मिरासदार व पुरंदरे यांच्या दिलखुलास गप्पांची मैफल रंगणार आहे. निवेदक सुधीर गाडगीळ त्यांच्याशी संवाद साधतील. 

अण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये शनिवारी (ता. 12) सायंकाळी सहा वाजता सयानी यांना "पुल स्मृती सन्माना'ने गौरविण्यात येईल. पुरस्कारानंतर सयानी हे त्यांच्या आवाजाचे गुपित उलगडणार आहेत. आरजे स्मिता त्यांच्याशी संवाद साधतील. रविवारी सकाळी दहा वाजता पं. भीमसेन जोशी नाट्यगृहात डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते नाम फाउंडेशनला "पुलोत्सव कृतज्ञता सन्मान' देण्यात येईल. याच ठिकाणी सायंकाळी सहा वाजता विजया मेहतालिखित "बाई' या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते होईल. 

Web Title: Pulotsav awards for da ma mirasdar