पुलवामा हल्ल्याचा बारामतीत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध

baramati
baramati

बारामती - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज बारामती शहरात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध केला गेला. देशासाठी वीरमरण पत्करलेल्या सर्व हुतात्ना जवानांना आज आदरांजली अर्पण केली गेली. 

येथील भिगवण चौकात आज सकाळी विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या वतीने या हल्ल्याचा निषेध केला गेला. 

अॅड. राजेंद्र काळे, अॅड. सुधीर पाटसकर, शेखर कोठारी, अविनाश देवकाते, अॅड. भार्गव पाटसकर, सागर चिंचकर, श्रीकांत जाधव, सागर जाधव, नीलेश वाबळे, प्रवीण धनराळे, पप्पू माने, अॅड. नंदकुमार भागवत, राजेंद्र गलांडे, शौकत बागवान, गोकुळ रेडे, उमेश दुबे, सुभाष वाघ, विश्वास मांढरे, सतीश काटे, शहाजी दळवी, अविनाश कदम, सुरेंद्र जेवरे, प्रवीण आटोळे, शैलेश दंडवते यांच्यासह अनेक नागरिक या प्रसंगी उपस्थित होते. 

लोकसभेच्या निवडणूका बाजूला सारुन पाकिस्तानशी थेट युध्द पुकारावे व त्यांना धडा शिकवावा, अशी मागणी या वेळी अनेकांनी केली. पाकिस्तान मुर्दाबाद, जला दो जला दो पाकिस्तान जला दो. अशा घोषणा संतप्त नागरिकांनी या वेळी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com