वाहक-चालकपदाची भरती रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

उमेदवारांना पीएमपी परत करणार परीक्षा शुल्क

पुणे - पीएमपीमधील वाहक आणि चालकपदाची भरतीप्रक्रिया रद्द करण्यात आली असून, ज्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांना ते परत मिळणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 

पीएमपीमध्ये चालकांची ७०६ आणि वाहकांची १०२३ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय पीएमपीने घेतला होता. त्यानुसार चालकपदासाठी ४ हजार ४४६, तर वाहकपदासाठी ४२ हजार ६६९ अर्ज प्रशासनाकडे आले होते. या उमेदवारांची परीक्षा एमकेसीएलतर्फे घेण्यात आली होती; परंतु त्यानंतर भरतीप्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाने घेतला. तसेच परीक्षा शुल्क उमेदवारांना परत देण्याचाही निर्णय झाला. त्यानुसार उमेदवारांनी शुल्क परत मिळण्यासाठी स्वतःचे नाव, पत्ता, आयएफएससी कोडसह बॅंक खाते क्रमांक, बॅंकेचे नाव, शाखा आदींची माहिती hrpmpml@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठविण्याचे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे. आत्तापर्यंत सुमारे ११०० उमेदवारांना ४ लाख २८ हजार ५०० रुपयांचे शुल्क परत करण्यात आले आहे. 

ज्या उमेदवारांनी अद्याप शुल्क परत घेतलेले नाही, त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत वरील माहिती पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. भरती प्रक्रियेबाबत अफवांवर कोणीही विश्‍वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाने 
केले आहे. 

Web Title: pun news driver conductor recruitment cancel in pmp