
Pune Crime News: परिसरात दहशत राहावी म्हणून तरुणांनी तलवारीने फोडल्या १४ हून अधिक गाड्या
Pune Crime News: पुण्यात दहशत राहावी म्हणून काही तरुणांनी तलवारीने १४ हून अधिक गाड्या फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिक्षा, दुचाकी, टेम्पो, चार चाकी, दुचाकी अशा विविध गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (pune Cars Ransacked )
पुण्यातील कोंढवा भागातील टिळेकर नगर मधील घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी हृषिकेश गोरे (२०), सुशील दळवी (२०), प्रवीण भोसले (१८) असे आरोपींचे नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हा सगळा प्रकार बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला.(Latest Pune News)
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ४ दुचाकीवर १०-१२ जण कोंढवा भागात असणाऱ्या टिळेकर नगर मध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या जवळील असलेल्या तलवार आणि इतर हत्याराने परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या. यात ६ चार चाकी, ३ दुचाकी, ३ टेम्पो, १ रिक्षा, १ छोटा टेम्पो असे एकूण १४ गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. (Latest Marathi News)
प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी आरोपी यांना शिवीगाळ केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आणि भागात आपले वर्चस्व टिकून राहावे म्हणून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून बाकीच्यांना शोध सुरू आहे.