पुणे : पोलिसांनी केली कुंटणखान्यातून 18 तरुणीची सुटका; शुक्रवारी राबविले 'कोम्बिग ऑपरेशन' 

पांडुरंग सरोदे
सोमवार, 1 एप्रिल 2019

पुणे  : तरुणीच्या इच्छेविरुद्ध त्यांना जबरदस्तीने शरीरविक्री करण्यास भाग पाडणाऱ्य़ा आणि त्यांना डांबून ठेवणाऱ्यांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठेत कोम्बिग ऑपरेशन राबवून कडक कारवाई केली. पोलिसांनी 18 तरुणींची सुटका केली. तर 9 घरमालक व व्यवस्थापकांना अटक केली.

पुणे  : तरुणीच्या इच्छेविरुद्ध त्यांना जबरदस्तीने शरीरविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या आणि त्यांना डांबून ठेवणाऱ्यांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठेत कोम्बिग ऑपरेशन राबवून कडक कारवाई केली. पोलिसांनी 18 तरुणींची सुटका केली. तर 9 घरमालक व व्यवस्थापकांना अटक केली.

जहाना मोहम्मद शेख, रुपा अब्दुलखान, मैली टिकातमांग, तारा बकतलमांग, शिमला साथमनथमांग, यास्मीन मोबिन शेख, काजल गोरेतमांग, गंगुबाई कांबळे (सर्व रा.बुधवार पेठ) असे अटक केलेल्या घरमालक व व्यवस्थापकांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील कुंटणखान्यातील काही घरामध्ये काही तरुणीना डांबून ठेवत त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडुन शरीरविक्री केली जात असल्याची खबर परीमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी फरासखाना पोलिसांना संबंधित तरुणीचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत बुधवार व शुक्रवार पेठेत कोम्बिग ऑपरेशन राबविले. या मोहिमेत परीमंडळ एकमधील 14 पोलिस अधिकारी, 70 पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. त्यावेळी 18 तरुणीकडुन जबरदस्तीने शरीरविक्रय करुन घेतला जात असल्याचे आढळले. त्यातून मिळणाऱ्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम घरमालक घेत असल्याचे तरूणींनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी 9 घरमालक व व्यवस्थापकांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार, तरुणींना रेस्क्यू फाउंडेशनमध्ये पाठविण्यात आले आहे.

Web Title: Pune: 18 girls rescued by police ; 'Combing Operation' executed on Friday

टॅग्स