पुणे: खासगी बस उलटून 20 महिला जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

पुणे: कोल्हापूर येथून देवदर्शनावरून परत येताना खासगी बस उलटून 20 महिला प्रवासी जखमी झाल्या. त्यापैकी तीन महिला गंभीर जखमी असून, त्यांच्यावर भोसरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना वडगाव बुद्रूक पुलाजवळ रविवारी (ता. 11) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एस. बी. बनसोडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात बसचालक शाम ठाकूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. सहायक निरीक्षक बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील सामाजिक कार्यकर्ता धनंजय आल्हाट यांनी मोशी परिसरातील महिलांसाठी कोल्हापूर येथे देवदर्शन सहल आयोजित केली होती. देवदर्शनाहून रविवारी सायंकाळी ते परत पुण्याकडे निघाले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रूक उड्डाणपुलावरून वारजेच्या दिशेने जात होते. त्यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटून 20 महिला जखमी झाल्या. या बसमध्ये एकूण 45 महिला प्रवासी होत्या.

Web Title: pune: 20 women injured in bus accident