Mahavitaran : पुण्यातील २२ हजार शेतकरी थकबाकीमुक्त

राज्य सरकारच्या कृषीपंप वीजजोडणी धोरणांतर्गत पहिल्या टप्प्यात शेतीपंपांच्या वीजबिलाच्या थकबाकीच्या रकमेत पन्नास टक्के सवलत देण्यात आली.
Mahavitaran
Mahavitaransakal
Summary

राज्य सरकारच्या कृषीपंप वीजजोडणी धोरणांतर्गत पहिल्या टप्प्यात शेतीपंपांच्या वीजबिलाच्या थकबाकीच्या रकमेत पन्नास टक्के सवलत देण्यात आली.

पुणे - शेतीपंचाच्या थकीत वीजबिलावरील व्याज व दंड माफीसह थकबाकीच्या रकमेत तीस टक्के सवलतीचा लाभ घेण्याची मुदत मार्चअखेर संपली. महावितरणच्या पुणे परिमंडलातील ५७ हजार २१० शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत थकीत वीजबिलांमध्ये तब्बल ९८ कोटी ७९ लाख रुपयांची सवलत मिळवली आहे. तर २२ हजार ८२६ शेतकरी शेतीपंपांच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त झाले आहेत.

राज्य सरकारच्या कृषीपंप वीजजोडणी धोरणांतर्गत पहिल्या टप्प्यात शेतीपंपांच्या वीजबिलाच्या थकबाकीच्या रकमेत पन्नास टक्के सवलत देण्यात आली. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात शेतीपंपांच्या वीजबिलाच्या थकबाकीत तीस टक्के सवलत आणि व्याज व दंडात माफी मिळविण्यासाठी मार्चअखेरची होती. एप्रिलनंतर थकीत वीजबिलांवर सवलतीची रक्कम वीस टक्के होणार आहे.

पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत ५७ हजार २१० शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ८० कोटी ६१ लाख रुपयांचे चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीपोटी ५५ कोटी ७३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या वीजबिलांच्या थकबाकीवरील व्याज व दंड आणि तीस टक्के सवलतीतून एकूण ९८ कोटी ७९ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. त्यापैकी २२ हजार ८२६ शेतकरी या योजनेचा लाभ घेत चालू वीजबिलांसह थकबाकीच्या ६८ कोटी रुपयांचा भरणा करत थकबाकीमुक्त झाले आहेत. वीजबिल कोरे केलेल्या या शेतकऱ्यांना थकबाकीच्या रकमेतून ४० कोटी ६६ लाख रुपयांची सवलत मिळाल्याचे महावितरणकडून सांगितले.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांतील १ लाख २६ हजार ४५२ शेतकऱ्यांकडे ९२६ कोटी ५९ लाख रुपयांची मूळ थकबाकी होती. सरकारच्या योजनेअंतर्गत या थकबाकीवरील व्याज व दंड आणि तीस टक्के सवलतीतून एकूण १४५ कोटी ८५ लाख रुपये आतापर्यंत माफ करण्यात आले आहेत. वीजबिल दुरुस्ती समायोजनाने ५८ कोटी ६५ लाख रुपयांनी थकीत रक्कम आणखी कमी होऊन सुधारित थकबाकी ७२२ कोटी ९ लाख रुपये झाली आहे. चालू वीजबिलासमवेत या थकबाकीचा भरणा करण्यासाठी मार्चअखेरपर्यंत ३० टक्के सवलत मिळणार होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com