पुणे : सव्वादोन कोटींचे स्वयंचलित स्वच्छता गृह धूळखात पडून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cleaning House
पुणे : सव्वादोन कोटींचे स्वयंचलित स्वच्छता गृह धूळखात पडून

पुणे : सव्वादोन कोटींचे स्वयंचलित स्वच्छता गृह धूळखात पडून

शिवाजीनगर - शहरातील वर्दळीच्या ठिकाणी महिलांना (Women) प्राधान्य देऊन माजी खासदार अनिल शिरोळे (Anil Shirole) यांच्या विकास निधीतून (Development Fund) सव्वादोन कोटीचे स्वयंचलित- स्वच्छता गृह (Cleaning House) विविध ठिकाणी बसवण्यात आले. मात्र, ते देखभाल दुरुस्ती अभावी धूळखात पडून आहेत.

जंगली महाराज रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन रस्ता) मॉडेल कॉलनी, भांडारकर रस्ता, विमान नगर, सिंहगड रस्ता, वाडिया महाविद्यालय, तळजाई टेकडी अशा महत्त्वाच्या ठिकाणी २०१८-१९ या आर्थिक वर्षात पंधरा युनिट, तेवीस सीटचे स्वयंचलित- स्वच्छता गृह, दोन कोटी अठरा लाख रुपये खर्च करून बसवण्यात आले. सबंधित खाजगी कंपनीने करारानुसार एक वर्ष मोफत देखभाल दुरुस्ती करून दिली. त्यानंतरही कंपनीने दोन वर्षे देखभाल दुरुस्ती चालू ठेवली. मात्र, नंतर केलेल्या देखभाल दुरुस्तीचे पैसे महापालिकेकडून न मिळाल्याने सध्या हे सर्व स्वच्छता गृह धूळखात पडून आहेत. पैसे टाकण्याचे बॉक्स तोडून टाकण्यात आले आहेत, वीज मिटर गायब आहेत, जागोजागी अस्वच्छता असून दुर्गंधी पसरली आहे. सबंधीत स्वयंचलित स्वच्छता गृहाच्या खाजगी कंपनीचे अधिकारी यांच्याबरोबर महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार अकरा मार्चला बैठक घेणार असल्याचे संबंधित घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

आम्ही नियमित हिरवाई येथे चालण्यासाठी येत असतो. महिलांसाठी सुरू केलेले सार्वजनिक स्वच्छता गृह बंद आहेत. त्यामध्ये पैसे टाकून देखील उघडत नाही. महिलांची गैरसोय होते. ते तात्काळ सुरू करावे.

- विद्या एकबोटे साई सारंग सोसायटी भांडारकर रस्ता

संबंधीत खाजगी कंपनीला स्वयंचलित स्वच्छता गृहाचे तंत्रज्ञान महापालिकेला सुपुर्द करण्याची मागणी केली असता त्यांनी असमर्थता दर्शवली. स्वयंचलित- स्वच्छता गृहाची संकल्पना चांगली आहे, परंतू किरकोळ रकमेसाठी नागरिक बॉक्स फोडतात. उपक्रम चांगला आहे. नागरिक व्यवस्थित वापर करायला हवा.

- अजित देशमुख, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग

आम्ही स्वयंचलित स्वच्छता गृहचा (सेटअप) देतो. देखभाल दुरुस्ती देखील आम्हीच करतो. मात्र, देखाभाल दुरुस्तीचा खर्च महापालिकेने देयचा असतो. तसा करार देखील झालेला आहे. दोन वर्षापासून देखभाल दुरुस्ती केलेला खर्च महापालिकेकडे पाठपुरावा करून देखील मिळाला नाही.

- निला राजे स्वयंचलित- स्वच्छता गृह व्यवस्थापक ग्राहक सेवा

संबंधित कंपनीने ठरल्याप्रमाणे एक वर्ष देखभाल दुरुस्ती करून दिली. सध्या महापालिका आणि संबंधित कंपनीचे बोलणे सुरू आहे. काही काळ महापालिकेच्या वतीने देखभाल दुरुस्ती करण्याचे काम केले. परंतु व्यवस्थीत झाले नाही. बुधवार (ता. ११) या दिवशी संबंधित कंपनी व महापालिकेची बैठक आहे. यामधून तोडगा निघेल.उपक्रम चांगला आहे. महापालिकेने व्यवस्थित देखभाल दुरुस्ती केली तर चांगले चालेल.

- आमदार सिध्दार्थ शिरोळे

Web Title: Pune 225 Crore Automatic Cleaning House In The Dust

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top