पुणे जिल्ह्यात ३१७१ रुग्ण झाले कोरोनामुक्त; तर 'इतके' नवे कोरोना रुग्ण आढळले

Corona-Virus
Corona-Virus

पुणे : पुणे जिल्ह्यात रविवारी (ता.९) दिवसभरात २ हजार ७५८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ३९० जणांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात ३ हजार १७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार ९२, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १९८, नगरपालिका क्षेत्रात ६१ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात १७ नवे रुग्ण सापडले आहेत.

रविवारी दिवसभरात ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही शनिवारी (ता.८) रात्री ९ वाजल्यापासून रविवारी (ता. ९) रात्री नऊ वाजेपर्यंतची  आहे. रविवारी मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २८ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १६ आणि नगरपालिका व कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात मिळून तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, रविवारी दिवसभरात ३ हजार १७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ७९ हजार ५९७ झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील ४८ हजार ६१४ जण आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com