पुणे : कोव्हीशील्डचे ३४ हजार डोस उपलब्ध

उद्या शहरात २०१ ठिकाणी लसीकरण
Corona Vaccine
Corona VaccineSakal media

पुणे : शासनाकडून महापालिकेला (Pune corporation) कोव्हीशील्ड (covishield ) लसीचे ३४ हजार ४०० डोस रविवारी सायंकाळी प्राप्त झाले असून, उद्या (सोमवारी) १९५ ठिकाणी कोव्हीशील्डचे लसीकरण होणार आहे. तर ६ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे लसीकरण होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. महापालिकेला शुक्रवारी कोव्हीशील्डचे २१ हजार मिळाले होते, पण हे डोस शनिवारी संपले. (Pune 34,000 covishield doses available)

शासनाकडून लस उपलब्ध झाली तर सोमवारी लसीकरण केले जाईल असे महापालिकेने स्पष्ट केले होते. शहरासाठी ३४ हजार ४०० कोव्हीशील्डचे डोस मिळाल्याने उद्या १९५ ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. तर काही ठिकाणी विशेष लसीकरण आयोजित केले जाते. तेथे लस वाटप केल्यानंतर महापालिकेकडे मंगळवारसाठी सुमारे १० हजार डोस शिल्लक राहणार आहेत.

Corona Vaccine
तळीये दुर्घटना: ग्रामस्थांच्या विनंतीनंतर प्रशासनानं थांबवली बचाव मोहिम

कोव्हीशील्ड

  • पहिल्या डोससाठी ४० टक्के लस आॅनलाइन बुकींगद्वारे

  • पहिल्या डोससाठी २० टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

  • पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (२ मे) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस आॅनलाइन

  • थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी २० टक्के लस दुसऱ्या डोससाठी

Corona Vaccine
Corona Update: राज्यातील 'या' मंडळात एकही मृत्यू नाही, जाणून घ्या सविस्तर

कोव्हॅक्सीन

  • ६ केंद्रांवर प्रत्येकी ३०० डोस

  • पहिल्या डोससाठी आॅनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

  • पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

  • २८ जून पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस आॅनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

  • दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com