७१ वर्षांच्या तरुणाने पुणे- नेपाळ सायकल वारी केली १७ दिवसांत पूर्ण !

सुभाष मुसळे या ७१ वर्षीय तरुणाने एकट्याने पुणे ते नेपाळ अशी १८०० किलोमीटरची सायकलवारी २८ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान, अवघ्या १७ दिवसांत पूर्ण केली.
७१ वर्षांच्या तरुणाने पुणे- नेपाळ सायकल वारी केली १७ दिवसांत पूर्ण !
७१ वर्षांच्या तरुणाने पुणे- नेपाळ सायकल वारी केली १७ दिवसांत पूर्ण !sakal

पुणे ः पाहिलेली स्वप्न पूर्ण करायला वयाचे बंधन ठेऊ नये ,अशा पुस्तकांच्या ओळी वाचायला जरी सोप्या असल्या तरी त्या ओळी सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, पण यामध्ये शरीराची साथ मिळतेच असे नाही, वयाच्या पासष्टी नंतर साधारणतः कुटुंबासोबत आरामदायी जीवन जगण्याचा, मित्रांसोबत वेळ घालवण्याचा, हास्यक्लबमध्ये जाण्याचा विचार केला जातो. परंतु सुभाष मुसळे या ७१ वर्षीय तरुणाने एकट्याने पुणे ते नेपाळ अशी १८०० किलोमीटरची सायकलवारी २८ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान, अवघ्या १७ दिवसांत पूर्ण केली. मुसळे यांनी गेल्या तीन वर्षात सुमारे ५००० किलोमीटरचे सायकलिंगही केले आहे.

मुसळे मूळचे मुंबईचे. शाळेत असताना सायकल चालवायची सवय होती. पण कधी सायकल चालवण्याकडे छंद म्हणून पाहिले नव्हते, नंतर काही वर्ष दिल्ली मध्ये व्यवसाय सांभाळला. १९९२ साली ते सहकुटुंब पुण्यात स्थायिक झाले.मित्रपरिवारासोबत असताना तरुणपणी खूप गोष्टी वेळेअभावी करायच्या राहून गेलेल्या असतात त्या पूर्ण करण्याची इच्छा असते, त्यातूनच छंद म्हणून सायकल प्रेमींकडे विशेष आकर्षण असल्याने त्याकडे ते वळले.सतीश आंबेरकर यांचा कडून त्यांना सायकल चालवण्याची प्रेरणा मिळाली, डिसेंबर २०१८ मध्ये ' सायकल सोबतचा प्रवासाचा ' संकल्प सोडला. आणि ३ जानेवारी २०१९ रोजी त्यांनी स्वतःची सायकल घेतली.वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी नियमित सायकल चालवण्यास सुरवात केली.

७१ वर्षांच्या तरुणाने पुणे- नेपाळ सायकल वारी केली १७ दिवसांत पूर्ण !
International Flights: 15 डिसेंबरपासून सुरु होऊ शकतात फ्लाईट्स; मात्र, या देशांत राहणार बंदी

पुण्यातील बालेवाडी पासून कामशेत, लोणावळा तर कधी सिंहगड असा हा सायकल प्रवास सुमारे १०० कि.मी रोज सुरु असायचा.दररोजचा सायकल रपेटचा पूर्ण आत्मवविश्वास आल्यानंतर पुणे ते बंगळूर सायकल वारी करण्याचा निर्णय त्यांच्या मनाने घेतला, या निर्णयाबद्दल कुटुंबासोबत तसेच मित्रांशी चर्चा केल्यावर सर्वांकडून खूप प्रोत्साहन आणि शुभेच्छा मिळाल्या.प्रवासाला निघण्यापूर्वी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय तपासण्या डॉक्टरांनी करून झाल्यानंतर ६ नोव्हेंबर २०१९ ला पुण्यातून बंगळूर साठी रवाना झाले आणि पुणे ते बंगळूर अशी ९०० किलोमीटर सायकल वारी अवघ्या ८ दिवसांत पूर्ण केली. या प्रवासादरम्यान सहा ठिकाणी त्यांनी मुक्काम केला, तिथल्या लोकांशी संवाद साधला. या सायकलवारीतून खूप सुखद अनुभव आणि अविस्मरणीय क्षण मिळाले, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये काही दिवस अमेरिकेत मुलाकडे राहायला गेले.पण त्यादरम्यान आलेला कोरोना आणि लॉकडाऊन मुळे भारतात लवकर परतणे त्यांना शक्य झाले नाही. दरम्यान च्या काळात अमेरिकेत देखील सायकल सरावासोबतच योगसाधना चालूच ठेवला.ऑगस्ट २०२१ ला भारतात परत आल्यानंतर पुन्हा पुणे ते नेपाळ सायकलवारी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.या टूर ची तयारी ते दोन महिने आधीपासूनच करत होते . वेळोवेळी घरच्यां कडून पाठिंबा आणि खूप प्रोत्साहन मिळत होतेच परंतु, हायवे वरून सायकल चालवताना होणाऱ्या अपघातांची कल्पना देखील त्यांना होतीच याचीच जास्त चिंता घरच्यांना वाटत होती , प्रवासाला निघण्यापूर्वीच्या तयारीच्या दृष्टीने प्रवासापूर्वी वॉर्मअप होण्यासाठी १० दिवस दररोज सुमारे चाळीस ते साठ किलोमीटर सायकल चालवली, त्यामुळे रोज १०० ते १२० किलोमीटर रोज सायकल चालविली तरी, त्रास होत नाही असे त्यांनी सांगितले.

७१ वर्षांच्या तरुणाने पुणे- नेपाळ सायकल वारी केली १७ दिवसांत पूर्ण !
कोरोनाचा 'तो' व्हेरियंट आता इस्रायलमध्येही; दक्षिण आफ्रिकेत माजवलाय हाहाकार

बंगळूर दौर्याप्रमाणे प्रमाणे या वेळेस देखील सायकल दुरुस्ती चे आवश्यक सामान, ट्यूब तसेच आवश्यक तितकीच कपडे, औषधे आणि कुटुंब मित्रपरिवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा घेऊन त्यांचा पुणे ते नेपाळ प्रवास सुरु झाला . २८ ऑक्टोबर ला पुण्यातून स्वारीला आरंभ करून १४ नोव्हेंबर ला सकाळी ११वाजून ३० मिनिटांनी भारत नेपाळच्या सीमेवर ही यात्रा संपन्न झाली,प्रवासात सुरुवातीला २ ते ३ दिवस हात पाय दुखतात पण चौथ्या दिवशी सवय होऊन जाते , त्यामुळे फार काहीसे वाटत नाही. असे त्यांनी सांगितले . नेपाळमध्ये लुम्बिनी शहारामधील प्रसिद्ध मायादेवी मंदिर, आणि गौतम बुद्धाचे वास्तव्य असलेल्या मंदिराच्या परिसरातील रम्य वातावरणात आत्मचिंतन केले.अश्याप्रकारे १८०० किलोमीटर सायकलवारी १७ दिवसात पूर्ण झाली. या प्रवासादरम्यान शिर्डी, मालेगाव, शिरपूर, ठिकरी, इंदौर, शाजापूर, बीओर, गुना, शिवपुरी, झांसी, ओराई, कानपुर, लखनऊ , फरिदाबाद, बंसी, येथे मुक्काम केला. 'प्रवास दरम्यान सह्याद्री विंध्य हिमालय पर्वतरांगा दृष्टीस पडत होत्या, प्रवासात लखनऊ ते अयोध्या दरम्यान सायकलची चैन सैल झाल्यामुळे १० कि.मी प्रवास पायी करावा लागला. लखनऊमध्ये उत्तराखंड चे क्रीडा मंत्री आनंद पांडे यांच्याशी प्रवासादरम्यान भेट झाली, त्यांचे आग्रहाचे निमंत्रण स्वीकारून त्यांच्या घरी पाहुणचार घेतल्या नंतर निर्धारित स्थळी पोहोचण्यास रात्री उशीर झाला. पण खूप आनंद देखील झाला, प्रवासादरम्यान बरेच दुचाकीस्वार आपणहून आपुलकीने चौकशी करत होते , कौतुक करत होते,प्रवासादरम्यान वेगवेगळ्या शहरातील स्वादिष्ट पक्वानांचा आस्वाद घेतला, त्यामध्ये नेपाळचे प्रसिद्ध व्हेज मोमोज खूप आवडले' असे ते म्हणाले.

पुणे-नेपाळ सायकलवारी दरम्यान एक गोष्ट पाहण्यास मिळाली ती म्हणजे अनेक ढाब्यांवर नाश्ता किंवा जेवणाचे पैसे कधी कधी स्वीकारायला नकार देत तेव्हा आग्रह करून त्यांना ते द्यावे लागायचे. बऱ्याच ठिकाणी मुक्काम केलेल्या हॉटेल्स मध्ये देखील 'आमचाकडून फ्री भेट' असे उत्तर मिळायचे.'अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली , पुणे-अयोध्या- नेपाळ सायकलवारीला स्वखर्चाने चोवीस हजार खर्च झाले.या प्रवासातून त्यांना खूप चांगले तसेच वाईट अनुभव मिळाले, चांगल्या आणि सुंदर क्षणांचा आस्वाद घेता आला, बरीच माणसे थोड्या वेळासाठी भेटली पण त्यातली काही माणसं आजही संपर्कात असल्याचा सुखद अनुभव मुसळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com