कोरोना आटोक्यात येतोय; रविवारी जिल्ह्यात आढळले ८१७ नवे कोरोना रुग्ण!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

जिल्ह्यात रविवार अखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख १४ हजार ४६२ इतकी झाली आहे. यापैकी २ लाख ८६ हजार ७३७ कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात रविवारी (ता.१८) दिवसभरात ८१७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील ३६६ जण आहेत. गेल्या 24 तासांत एकूण ६ हजार ५३२ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर १ हजार ८३० कोरोनामुक्त झाले आहेत. 

रविवारी पुणे शहरांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये १९५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १७७, नगरपालिका क्षेत्रात ६६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १३ नवे रुग्ण सापडले आहेत. 

Navratri Festival: गरबा-दांडियाही झाला डिजिटल; यंदा गरबा स्पर्धा होणार ऑनलाईन​

दरम्यान, रविवारी ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील सर्वाधिक १९ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ४ आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६ आणि नगरपालिका क्षेत्रातील २ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही शनिवारी (ता.१७) रात्री ९ वाजल्यापासून रविवारी (ता.१८) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. 

पुण्याच्या 'मिनिएचर आर्टिस्टने साकारली अवघ्या तीन मिलिमीटरची विठ्ठलाची मूर्ती​

जिल्ह्यात रविवार अखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख १४ हजार ४६२ इतकी झाली आहे. यापैकी २ लाख ८६ हजार ७३७ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ७ हजार ४४९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३२४ जणांचा समावेश आहे. सध्या शहरातील विविध रुग्णांलयांत १० हजार ८४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त ९ हजार ५७८ रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार केले जात आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune 817 new corona patients found on Sunday 18th October 2020