ABVP : अभाविप राबवणार ‘आनंदमयी सार्थक विद्यार्थी जीवन अभियान’

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (अभाविप) राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक नुकतीच पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणात पार पडली.
ABVP
ABVPesakal

पुणे - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (अभाविप) राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक नुकतीच पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणात पार पडली. या बैठकीत पारित झालेल्या ‘शैक्षणिक परिसर हे आनंदमयी सार्थक विद्यार्थी जीवनाचे केंद्र व्हायला हवे’ या प्रस्तावानुसार येत्या वर्षभर ‘अभाविप’तर्फे ‘आनंदमयी सार्थक विद्यार्थी जीवन अभियान’ राबवण्यात येणार आहे.

‘अभाविप’चे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल यांनी सोमवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी अभाविपचे राष्ट्रीय मीडिया संयोजक आशुतोष सिंग, पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल आदी उपस्थित होते. शुक्ल म्हणाले, ‘सद्यस्थितीत देशात विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. अभाविप विद्यार्थ्यांचे शिक्षण, स्वयंरोजगार, प्रादेशिक विद्यापीठांची स्थिती, शुल्क संबंधित विषयांवर मुख्यतः कार्य करण्यासह पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने युवा नेतृत्वात सकारात्मक दिशेने कार्य करेल.’

ABVP
Katraj News : तीन महिन्याच्या बाळाच्या पोटातून काढली अंगठी; बाळाचा जीव वाचवण्यात यश

या बैठकीत ‘राज्य सरकार व विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक क्षेत्राच्या गुणवत्तेवर भर दिला पाहिजे’, ‘भारत विरोधी वैश्विक षडयंत्राचा युवकांनी पराभव करायला हवा’ आणि ‘स्व आधारित व्यवस्था निर्माणासाठी समाजाने पुढाकार घ्यावा’ हे प्रस्तावही पारित झाले. ९ जुलै २०२३ ला अभाविप आपल्या ऐतिहासिक संघटनात्मक यात्रेच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या महत्त्वाच्या वर्षात विद्यार्थ्यांशी संबंधित विषयांना ‘अभाविप’च्या विविध अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात पुढे आणण्याची कार्य योजना या बैठकीत निश्चित झाली, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com