विद्यार्थ्यांवर केलेल्या मारहाणीबाबत पुण्यात 'अभाविप'तर्फे निषेध

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (पुणे महानगर) धुळे येथे विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (पुणे महानगर) धुळे येथे विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. सरकारच्या निषेध करण्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी डेक्कन परिसरात गुरुवारी (ता.27) उपोषण केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धुळे येथे सामान्य विद्यार्थ्यांवर धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. या प्रकरणाचा निषेध अभाविपतर्फे करण्यात आला. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे व त्यावर न्याय मागणे, हा कोणता गुन्हा आहे, परीक्षा शुल्क परत मागितले तर विद्यार्थ्यांचे काय चुकले, विद्यार्थ्यांवर केलेली ही कार्यवाही कितपत योग्य आहे, असे अनेक प्रश्न यावेळी विद्यार्थी कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune abvp protests to beating of students in dhule